अकोट: आज उपवनसंरक्षक वन्यजीव विभाग आकोट येथील तायडे साहेब संबंधित अधिकारी यांना निवेदन दिले. आकोट शहर मध्ये राहुल नगर व मोठे बारगन येथील पिसाडलेले वानर यांचा बंदोबस्त तोरीत लावा दि.12.12.2022 रोजी राहुल नगर येथील संघपाल तेलगोटे या युवकाला घराजवळ एका पिसाडलेल्या वानरणे पायाला जबर चावा घेतला आणि युवक जागीच खाली पडला व युवकाला लगेच ग्रामीण रुग्णालय आकोट येथे उपचार करण्यात आला.
आकोट शहर मध्ये राहुल नगर व मोठे बारगन ठिकाणी अगोदर सुद्धा अस्या घटना घडल्या आहेत या कडे वनविभाग यांनी लक्ष देण्याची गरज आहे व वानराने चावा घेतलेलेल्या युवकचा दवाखान्याचा खर्च वनविभाग यांनी तोरीत त्या युवकल द्यावा व आकोट शहरातील फिरत्या पिसाडलेल्या वानरांचा बंदोबस्त करावा यामुळे मोठी जीवित हानी टाळू शकेल नाहीतर असे नाही केल्यास आम्ही आपल्या कार्यालय समोर आंदोलन करू काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असा इशारा वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी यांनी निवेदन देते वेळी दिला उपस्थित रामकृष्ण मिसाळ शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट सुभाष तेलगोटे शहर अध्यक्ष भारीप सदानंद तेलगोटे शहर उपाध्यक्ष भारीप आकोट लखन इंगळे शहर उपाध्यक्ष वंचित आकोट नितीन तेलगोटे इम्रानखान पठाण मंगेश कामळे प्रतीक तेलगोटे नवनीत तेलगोटे सुगत तेलगोटे यांचे नावे व सह्या आहेत.