
परभणी (प्रतिनिधी) — परभणीतील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संजय बगाटे यांच्या कन्या मयुरी बगाटे यांचे दुःखद निधन झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी बगाटे परिवाराच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली.
या वेळी अशोक भाऊ सोनोने (वंचित बहुजन आघाडी केंद्रीय सदस्य व परभणी जिल्हा समन्वयक), भीमराव तायडे गुरुजी (राज्य संघटक, भारतीय बौद्ध महासभा), प्रा. सुरेश शेळके (विभागीय प्रशिक्षक), प्रमोद कुटे (जिल्हाध्यक्ष उत्तर विभाग), मनोहर वावळे (जिल्हाध्यक्ष दक्षिण विभाग), मुद्दसीर असरार (महानगर अध्यक्ष), एन. जी. खंदारे, रंजीत मकरंद व प्रा. अतुल वैराट यांनी बगाटे परिवारास भेटून सहवेदना व्यक्त केली.
पदाधिकाऱ्यांनी या दुःखद प्रसंगी बगाटे परिवाराला धीर देत “या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच आमची मनःपूर्वक प्रार्थना” असे सांत्वनाचे शब्द व्यक्त केले.