
अकोला(प्रतिनिधी): आगामी अकोला महानगर पालिका निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची रणनिती ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही बैठक 31 ऑगस्ट रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व आद. अंजलीताई आंबेडकर यांच्या निर्देशाने आयोजित या बैठकीत निवडणुकीसाठी पक्षाची दिशा व धोरण निश्चित करण्यात आले. इच्छुक उमेदवारांची निवड प्रक्रिया, बुथ कमिटीचे संघटन, स्थानिक पातळीवरील प्रचारयोजना तसेच आगामी निवडणुकीत वंचित आघाडीची भूमिका या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.बैठकीस जिल्हा समन्वयक ऍड. नतिकउद्दीन खतीब, जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, गटनेते गजानन गवई ,रऊफ पैलवान, महिला महासचिव संतोष मोहोड, जुनैद मंजर, अनवर शेरा यांनी निवडणूक तयारी संदर्भात विचार मांडले.बैठकीस इच्छुक उमेदवार, आजी-माजी पदाधिकारी, बुथ प्रमुख व विविध विंगचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांची उपस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की बैठक ऐक्यसभेत रूपांतरित झाली.
या वेळी उपस्थितांमध्ये पुरुषोत्तम अहीर, महेंद्र डोंगरे, सुभाष तायडे, किरण शिरसाट, डॉ. प्रफुल वानखडे, डॉ. गजानन इंगळे, अश्विनी ताई बागडे, योगिता ताई वंजारी, मनोज वंजारी, ऍड. अकाश भगत, जानी भाई, बजरंग नागे, इर्शाद भाई, सागर खाडे, वसिम खान, बुद्धरत्न इंगोले, बाबा भाई, विदेश बोराडे, शफिक शाह, मो. सादिक, साहील रिझवी, सैय्यद रहिम, हैदर शाह, रझा भाई, मो. याकुब, मो. सोहेल, सुरेश कलोरे, राजेश मोरे, विक्रांत बोराडे, मौलाना मुदस्सीर, मो. जाफर, मो. इस्माईल, बाबुभाई, सादिक मनियार, मोहसीन भाई, शकील एम. आर., नाजीम खान, शेख अफसर, सलमान खान, वसीम खान, मो. अनस, हुसेन भाई, लड्ड्या भाई, राजू भाई काझी, जुबेर भाई पेंटर, लियाकत मामु, शहजादा, इम्रान, वकार आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
बैठकीचे आयोजन महानगर अध्यक्ष कलीम खान पठाण यांनी केले. सूत्रसंचालन रिजवान भाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन महानगर प्रवक्ता रंजित वाघ यांनी केले.