तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कडून निदर्शने व धरणे आंदोलन सुरू

कीसान के सन्मान मे वंचित आघाडी मैदान में

तेल्हारा प्रतिनिधी :-वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुका वतीने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्याकरिता जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनात धरणे आंदोलन तेल्हारा तहसील कार्यालयात समोर करण्यात आले.

सन 2022 मध्ये तेल्हारा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी चे दिलेले अनुदानाचे पैसे तीन दिवसात वापस जमा करा अशा नोटीस तहसील कार्यालयामार्फत तेल्हारा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दिल्या गेल्या आहेत 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले पिकाचे नुकसानाची सरकारने दिलेली मदत ही तुटपुंजी मदत असून झालेले नुकसान प्रचंड प्रमाणात आहे आणि 2022 मध्ये दिलेली तुटपुंजी मदत 2025 मध्ये तीन दिवसाच्या आत सरकारकडे जमा करण्याच्या नोटीस दिल्याने शेतकरी प्रचंड मानसिक दबावाखाली आला आहे एकीकडे पिकाला भाव नसून उत्पन्न ही निसर्गाच्या कोपामुळे नाही आहे शासनाने दिलेली आर्थिक मदत तीन दिवसात जमा करण्याच्या नोटीस मुळे शेतकरी प्रचंड दबावात असून यामुळे शेतकरी आत्महत्या सारखे प्रकार होऊ शकतात त्यामुळे दिलेल्या नोटीस त्वरित वापस घ्याव्या ही मागणी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी धरणे आंदोलन करून मागणी करण्यात आले तसेच तेल्हारा तालुक्यातील पडीत गायरान जमिनीवर अनेक भूमिहीन शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून प्रचंड मेहनत करून शेती तयार करून उदरनिर्वाह करणे एवढे पीक गायरान जमिनीवरून काढत असून आपला उदरनिर्वाह करत आहेत तसेच गावालगत च्या सरकारी जमिनीवर अनेक बेघर गरीब कुटुंबांनी राहायला आसरा घेऊन त्यावर राहत आहेत या गायरान व गावालगतच्या सरकारी जमिनीवर जाणीवपूर्वक सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे अनेक कुटुंब हवालदिल झाले वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शासनाला गायरान जमिनीवरील व गावालगतच्या सरकारी जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावे ही मागणी धरणे आंदोलनातुन करण्यात आली आहे.

यावेळी प्रमोद देंडवे मिलिंद इंगळे आम्रपाली ताई खंडारे संगीता ताई अढाऊ अशोक दारोकार सुनील इंगळे मधुसूदन बरींगे सुभाष रौंदळे,निलोफर शहा , सौ. आम्रपाली गवारगुरु सभापती, किशोर मुंदडा उपसभापती ,प्रा.संजय हिवराळे गटनेता, अनिल उमाळे,अरविंद तिव्हाने अनील मोहोड, मोहम्मद ईद्रीस विद्याताई शामस्कर, हेमलता काळपांडे, प्रकाश खोब्रागडे जीवन बोदडे, श्रीकृष्ण जुमडे , चंदू बोरसे, विलास हिवराळे प्रफुल मोरे. रतन दांडगे मुबिन गुरुजी.मिरा बोदडे सरपंच ,सपना वाकोडे , विना मोहोड,झिया शहा नितीन वानखडे ,जिवन बोदडे पंजाब तायडे अनंता इंगळे, प्रमोद चांदुरकर सुनील वानखडे प्रमिला गवई , आनंद बोदडे नरेश बांगर महादेवराव नागे खंदुजी घाटोळ, दीपक दारोकार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते 100% अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते दोन्ही मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्या अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी हा ईशारा आंदोलनातुन देण्यात आला आहे

प्रतिनिधी रोहीत हीवराळे

Leave a Reply

Your email address will not be published.