
तेल्हारा दि. 23 जानेवारी 2025|
तेल्हारा शहरातील प्रतिष्ठित नागरिक सचिन रामदास यादगिरे , प्रवीण रामदास यादगिरे यांचे वडील रामदास महादेवरावजी यादगिरे (६८) रा. जय भवानी चौक, तेल्हारा यांचे बुधवार दि. 22 जानेवारी 2025 रोजी पहाटे 02:30 ला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुख:द निधन झाले. स्व. रामदास महादेवरावजी यादगिरे यांनी आजच्या महागाईच्या काळात गोर-गरीब जनतेला तब्बल 3 दशक एक रुपया-दोन रुपया याप्रमाणे किरकोळ भावात किराणा विक्री करून , असंख्य गोरगरीब नागरिकांचे मन जिंकून त्यांच्या मनावर अधिराज्य केले तसेच हे स्व. रामदास यादगिरे यांच्या जीवनातील उल्लेखनीय कार्य असून त्यांचे अचानकपणे झालेल्या निधनाने त्यांच्या परिवारासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, एक मुलगी, सुना ,नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.