दिनांक : ८ डिसेंबर रोजी, फुले-आंबेडकर विद्वत सभा जिल्हा अकोला द्वारे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन कार्यक्रम अशोक वाटिका सभागृह, अकोला येथे संपन्न झाला..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून “महापरिनिर्वाण दिन” या कार्यक्रमात सहभागी अध्यक्ष मा. साहेबराव ओईम्बे. जिल्हा समन्वयक, फुले-आंबेडकर विद्वत सभा, मार्गदर्शक म्हणून फुले-आंबेडकर विद्वत सभेचे मा. भास्कर भोजने सर हे प्रमुख पाहुणे सहभागी होते. तसेच मा. पी. जे. वानखडे सर जिल्हाध्यक्ष, भा. बौद्ध महासभा, अकोला, नंदकुमार डोंगरे सर, जिल्हा महासचिव, भा. बौद्ध महासभा, अकोला, मा. सिद्धार्थ देवदरीकर विभागीय समन्वयक, फुले-आंबेडकर विद्वत सभा, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. मुरलीधर इंगळे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. संदीप डोंगरे व आभार प्रदर्शन भाऊराव सोनोने यांनी केले..

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. डॉ. संजय पोहरे सर जिल्हा समन्वयक यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रानिर्मितीचे विचार या विषयावर व्याख्यान केले.

फुले-आंबेडकर विद्वत सभेचे मा. भास्कर भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेडकरवादी चळवळ आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर खुली चर्चा करण्यात आली..

महापरिनिर्वाण दिन या कार्यक्रमात फुले-शाहु-आंबेडकरी विचारांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता, तसेच फुले-आंबेडकर विद्वत सभा, जिल्हा अकोला चे प्रा.अनिता गवई, सिद्धार्थ शामस्कार, दादा गवई, गणेश गोपनारायण, निलेश वाहुरवाघ, डॉ. प्रफुल्ल वानखडे, अॅड. अक्षय डोंगरे, प्रा. संघपाल खंडेराव, प्रा. राहुल माहुरे, बी. सी. खाडे, इंजि. विनोद खंडारे, प्रा. संतोष पेठे, रविंद्र कांबळे, दौलत भगत, नानाभाऊ सिरसाट, मुरलीधर तारक, रामदास भगत, कैलास मोहोड, सिद्धार्थ चक्रनारायण, अशोक गुडधे, इंजि. सचिन वरठे, अनंत वानखडे, भारत दामोदर, अरुण खाडे, बाबुराव वानखडे, शिवदास खंडारे, जीवराज खंडारे, प्रा. अविनाश अहिर, दिलीप वानखडे, गणेश गवई, भगवान उमाळे, सचिन डोंगरे, मिनाताई जंजाळ, विलास कांबळे, विजय भेले, प्रा. अनिल वानखडे, बिंदुश मनवर, इंजि. भास्कर सावळे, विलास इंगळे, प्रभाकर निखाडे, राहुल भगत, भाऊदास अरखराव, प्रमोद वानखडे, डॉ. प्रफुल्ल वानखडे, मिलिंद मनवर, विनोद सरदार, संतोष खंडारे, राजरत्न डोंगरे व आदी या कार्यक्रमात उपस्थित होते..

जय भीम..

Leave a Reply

Your email address will not be published.