सार्थक वक्तृत्व अकॅडमी तर्फे अशोक वाटिका येथे अभिनंदन करण्यात आले.
अकोला – नवी दिल्ली येथे दलित साहित्य अकादमी सम्मेलन मधे अकोला येथील ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर कवडे यांना दि. 11 डिसेंबर 2022 रोजी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले नॅशनल फेलोशीप अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर कवडे यांनी समाजात सातत्याने नवनवीन राबविलेल्या उपक्रमाची दखल घेत आणि समाज कार्यात त्यांचे योगदान पाहता नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय दलित सम्मेलनामध्ये मणीपुरचे राज्यपाल तारीकी शुक्ला, अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष सोहनलाल सुमन अक्षर, जय साहेब सुमन अक्षर, डॉ. जितेंद्रजी मनुसाहेब यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराच्या निमित्ताने दि. 14 डिसेंबर 2022 रोजी स्थानिक अशोक वाटीका येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यामधे सार्थक वक्तृत्व अकॅडमी तर्फे देखील त्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेव्हा सत्कारामध्ये पुरुषोत्तम वानखडे, राजेश वानखडे, ग्रामीण पत्रकार परिषदेचे पी. टी. धांडे, नंदकिशोर सहस्त्रबुद्धे, लिलाताई सहस्त्रबुद्धे, विशाल नंदागवळी, लक्ष्मण नंदागवळी, अॅड. श्रीकांत वाहुरवाघ, नागेश गवई, लताताई लोणारे, हुसेन खान, हिरामन रोकडे, समाधान सुरुशे, मधुकर लबडे, यासीन खान, मिलन टेलर, प्रकाश सदांशिव, शांताराम गोपनारायण, शेषराव सिरसाट, अनिल सिरसाट, बंडू वानखडे , देवमन वाहुरवाघ, सेवानंद धांडे, अंसारभाई, लाल खॉं भाई, फरीदाजी बानो, वाजीद खा, आमीर खान, मच्छिंद्र वाहुरवाघ, झाकीर हुसेन खान, अर्चनाताई वाहुरवाघ, भवते साहेब, तुकारामजी कांबळे, कु. सोनम लबडे आदी मान्यवर हजर होते.