सायबर पोलीस स्टेशन अकोला यांचेकडुन ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील १८,९८,५२५/- रूपये रक्कम नागरिकांना परत

प्रशिक मेश्राम

अकोला प्रतिनिधी; आजच्या युगात इंटरनेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. इंटरनेट माध्यमाने मानवी जीवन सुलभ झाले आहे हे जितके खरे तितकेच याच्या वापराबाबतच्या अपुऱ्या माहितीने ते धोक्यातही आले आहे. सायबर गुन्हेगार याच उणीवांचा फायदा उठवून इतरांचे आर्थिक व सामाजिक नुकसान करतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर सुरक्षितरित्या करणे हि काळाची गरज आहे.

सध्या सोशल मिडीयावर बनावट अकाउंटवरून शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळविल्याबाबतचे विविध जाहिराती, व्हिडीओ दाखवुन नागरिकांना प्रलोभन दाखविले जाते अशा प्रकारच्या जाहिरातला बळी पडुन अनेक जणांची फसवणुक करण्यात येत आहे. अशाप्रकारच्या फसव्या जाहिरातीला प्रतिसाद देणे टाळावे. अशा प्रकारच्या कोणत्याही अनोळखी सोशल मिडीयावरील अकाउंटला खात्री केल्याशिवाय प्रतिसाद देवु नये. तसेच टेलीग्रामवर बरेच तरूण-तरूणी पार्टटाईम जॉब, टाक्स जॉबला बळी पडत आहेत यामध्ये टिकीट बुक करणे, इझी मनी, गुगल अॅड रिद्ध, मनी टूसफर अशा टाक्सच्या नावावर काहि दिवस रक्कम वापरण्यास दिली जाते त्यानंतर फी स्वरूपात पैशांची मागणी करून रिफंडच्या नावावर फसवणुक केली जाते. त्याचप्रमाणे बँकेचे ग्राहक सेवा प्रतिनीधी, KYC Update, Electricity Bill असल्याचे सांगुन देखील फसवणुक केली जाते.

माहे जानेवारी २०२४ ते आजपावेतो सायबर पोलीस स्टेशन, अकोला यांनी अशा प्रकारच्या विविध ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील एकुण १८,९८,५२५/- रूपये रक्कम नागरिकांना परत करण्यात यश मिळविले तसेच एकुण ३३,७२,३३६/- रूपये रक्कम सायबर पोलीस स्टेशन, अकोला कडुन होल्ड करण्यात आली आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे, यांच्या मार्गदर्शनात पो. नि. शंकर शेळके व सर्व सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार यांनी केली.

तरी नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, आपल्या बँक खात्यांविषयी, केडीट कार्ड किंवा ए.टी.एम. कार्डची वैयक्तीक माहिती कोणालाही फोनद्वारे देवु नये. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक, अथवा अॅप्लीकेशन कोण्या व्यक्तीचे सांगणे प्रमाणे डाउनलोड करू नये. SIM Card KYC, KYC Update, Electricity Bill बाबत आलेल्या मॅसेजला प्रतिसाद देवु नका. ओ.एल.एक्स. सारख्या अॅपवरून अनओळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करतांना शहानिशा करूनच आर्थिक व्यवहार करावा. अशाप्रकारच्या फसव्या प्रकारा पासुन सावध रहावे. तरी आपली ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ Cyber Helpline No -1930 किंवा website: cybercrime.gov.in वर तक्रार करावी.

Leave a Reply

Your email address will not be published.