मागील दोन वर्षा पासुन आता पर्यंत ७५४ मोबाईल शोधण्यास यश…!
अकोला जिल्यातील हरवलेले तथा चोरी गेलेले मोबाइल ट्रेस करुन ते मोबाइल धारकांना परत मिळवून देण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून शहरासह जिल्हयात मोबाईल शोध विशेष मोहीम राबविण्यात आली होती. सन २०२४ मध्ये दिनांक ३१.१२.२०२४ पावेतो एकुण ५५४ मोबाईल कीमत १ कोटी १२ लाख रूपायाचे मुळ मालकास परत करण्यात आले आहेत. त्याकरीता (Central Equipment Identity Register) हे शासकीय ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. मागील अडीच महीण्याच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा, आणि पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेल्या पोलीस अंमलदारांनी विशेष प्रयत्न करून सायबर तंत्रज्ञानाच्या आधारावर अकोला जिल्हातील हरवलेले माहे फेब्रुवारी पर्यंन्त ४२ लाख कींमतीचे एकूण २०० मोबाइल (स्मार्टफोन) राज्य तथा ईतर राज्यातून शोध घेवुन ताब्यात घेतले आहेत.
त्या अनुषंगाने आज दिनांक १३.०३.२०२५ रोजी दुपारी १५.४५ वाजता राणी महल पोलीस लॉन, अकोला येथे मा.श्री. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या हस्ते मोबाईल मूळ मालकास परत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. प्रास्तावीक सपोनि श्रीमती कान्होपात्रा बन्सा यांनी केले.
मा. पोलीस अधीक्षक यांचे आवाहन-
मा. पोलीस अधीक्षक यांनी आपल्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचा उददेश समजावुन सांगतांना, पोलीसांच्या प्रति विश्वासपुर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी भविष्यात सुदधा अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आपले कडुन काही चुका होवु नये यासाठी खबरदारी घेणे महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले. आपला डीजीटल मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सि.ई.आय. आर. (Central Equipment Identity Register) पोर्टल वर ऑन लाईन तकार करावी तसेच नागरीकांनी सुदधा आपले सोबत काहि अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस विभागाशी तसेच ऑन लाईन साईड एन.सी.आर. बी. पोर्टल (National Cybercrime Reporting Portal) वर तकार करण्याचे आवाहन केले.
मान्यवारांनी आपल्या मार्गदर्शनात अकोला पोलीसांचे कौतुक करत केलेल्या कामगीरी बददल समाधान व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांगी नागरीकांशी संवाद साधला त्यामध्ये भांबेरी येथुन आलेले ऋषीकेश यांनी मोबाईल परत मिळाल्याने अकोला पोलीसांचे आभार मानले, सर्व तक्रारदार/फिर्यादी यांचे चेह-यावर आपला मोबाईल परत मिळाल्याचा आनंद होता सोबतच पोलीसांच्या चेह-यावर कर्तव्याप्रति समाधान दिसत होते.
यावेळी, मा.श्री. अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक अकोला, मा. श्री. अनमोल मीत्तल सहायक पोलीस अधीक्षक अकोट विभाग, मा. श्री. सतीश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला, मा. श्री. मनोहर दाभाडे उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तीजापूर विभाग, प्रो. डीवायएसपी मा. श्री. कीरण भोंडवे, मा. श्री शंकर शेळके पोनि. स्थागुशा अकोला, तसेच जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती. यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता रापोउपनि साबळे, सायबर व स्थागुशा चे यांचे टीम ने मेहतन घेतली, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. श्री. अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक अकोला यांनी केले तर सुचसंचालन प्रो पोउपनी मयुरी सावंत पोस्टे खदान, प्रोउपनि तनुजा खोब्रागडे यांनी केले.