अकोला येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह येथे 26 नोव्हेंबर 2024 ला संविधान दिन साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृहाचे गृहपाल श्री. तिडके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुसतकर सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी अकोला व अकोला बॉडीबिल्डींग असोसिएशन चे व वंचित बहुजन आघाडीचे मा. जिल्हा उपाध्यक्षत. वंचितांचा प्रकाश या ( साप्ताहिक ) मुख्य संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. महेंद्र डोंगरे यांची उपस्थिती होती, यावेळी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले, त्यानंतर श्री. सुसतकर यांचा सेवापुर्ती सत्कार करण्यात आला, आणि प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले, त्याचप्रमाणे वस्तीगृहाचे विद्यार्थी ऍड. घोंगळे यांनी भाषण केले, गृहपाल तिडके सरांनी संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना भाषणातुन सांगितले, चित्रीकरण विद्यार्थी धीरज सिरसाठ यांनी केले,सुत्रसंचालन ऍड. नितीन जामनिक यांनी केले तर आभार ऍड. ताजने यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वस्तीगृहातील सर्व विद्यार्थी व BVG रक्षक ठोंबरे, प्रविण खंडारे सह उत्साहपूर्ण वातावरणात संविधान दिन साजरा करण्यात आला.