काँग्रेसच्या भूमिकेचे वंचितकडून स्वागत – अँड आंबेडकर

अकोला….. दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रभारी श्री चेन्नईलथा यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या वार्तालापमध्ये वंचित बहुजन आघाडीने सुचविलेला 39 मुद्द्यांचा मसुदा काँग्रेस ने मान्य केला आहे असे कळविले आहे . पक्षातर्फे आम्ही काँग्रेसच्या या भूमिकेचे स्वागत करतो, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. आता
महायुतीतील काँग्रेस, एनसीपी (शरद पवार गट) व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या तिन्ही पक्षांना आमची आग्रहाची विनंती आहे की, त्यांनी आपापल्या पक्षाचा मसुदा काय आहे तो देखील आमच्यासोबत शेअर करावा म्हणजे आपण कोणकोणत्या मुद्यांवर एक आहोत आणि कोणकोणत्या मुद्यांवर मतभेद आहेत हे स्पष्ट होईल . त्याचप्रमाणे श्री चेन्नईलथा यांनी असेही सांगितले की, महाविकास आघाडी मधील घटक पक्षांची जागावाटपाची बोलणी जवळपास पूर्ण झाली आहे .
या संदर्भात अँड बाळासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका मांडताना पुढे स्पष्ट केले की, काँग्रेसने पुढच्या बैठकीत त्यांचा जागावाटपाचा तपशील आम्हाला सांगावा म्हणजे आम्हाला ज्या जागा पाहिजे आहेत त्याबाबतीत आम्ही संबंधित पक्षाशी चर्चा सुरू करू शकतो , आणि लगेचच दुसऱ्या बैठकीत त्या संबंधी आपण निर्णय घेऊ शकतो . कोणत्या पक्षाला कोणत्या जागा मिळाल्यात याची माहिती तूर्तास जरी वंचित आघाडीकडे नाही तरी सदर माहिती वंचितला लेखी किंवा वृत्तपत्र किंवा त्यांना सोयीच्या माध्यमातून कळविले तर आमच्यासाठी चांगले होईल असेही ते म्हणाले.
महायुतीतील सर्वच पक्षांनी एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून ज्या जागांवर समझोता केला, त्यानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे स्पष्ट झाले तर त्या पक्षासोबत आम्हाला वाटाघाटी आणि चर्चा करणे सोयीचे होईल. आणि त्यातून योग्य मार्ग निघेल.
भाजपाला पराभूत करणे हे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य टारगेट आहे असही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा . धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, मीडिया प्रमुख अँड. नरेंद्र बेलसरे व विकास सदाशिव, पराग गवई यांची उपस्थिती होती.

बॉक्स….
अद्याप जागांची मागणी नाही….
महाविकास आघाडी आमच्या डायरेक्ट समावेश नसून आम्ही निमंत्रक आहोत. आम्ही जागेची मागणी सुद्धा केलेली नाही. वंचित बहुजन आघाडी किती जागा लढवेल याबाबत सुद्धा चर्चा झाली नाही. कुठल्या मुद्द्यावर आपण एकत्र येत आहोत यांची घटक पक्षांनी जाणीव ठेवावी, जेणेकरून योग्य मार्ग निघेल अशी अपेक्षा अँड. आंबेडकरांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.