ॲड. प्रकाश आंबेडकरांचे मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र..
दिनांक 19 मार्च,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्र लिहिले आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्रातील ज्या जागांवर लढत आहे, त्यातील 7 जागांवर वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देईल, असा निर्णय वंचित च्या वतीने घेण्यात आल्याचे सांगितले आहे.
तसेच, खर्गे यांना विनंती केली आहे की, महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला ज्या जागा आल्या आहेत. त्यातील 7 मतदारसंघांची नावे आमच्याकडे द्यावीत. वंचित बहुजन आघाडी तुमच्या पसंतीच्या या 7 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना सर्व प्रकारचा आणि धोरणात्मक पाठिंबा देईल असे सांगितले. वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही, तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे, असे या पत्रात म्हटले आहे.या पत्राने मविआ ची कोंडी होताना पाहायला मिळत आहे. तर भविष्यात काँग्रेस कडून ही वंचीतला पाठींबा दिला जाणार का हा प्रश्न उपस्थित होतो आहे. या पत्राने राजकीय खळबळ उडाली आहे.