पिंजर येथे ॲड. प्रकाश आंबेडकर व अंजलीताई आंबेडकर यांची सांत्वनपर भेट

आज दिनांक 2/1/ 2024 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे सांत्वन भेट दिली
दिनांक 22 डिसेंबर 2023 दुपारी 4 वाजल्यापासून शेख अफान शेख आयुब वय वर्ष 7 हा अचानक बेपत्ता झाला गावात सर्वात सर्वत्र शोध घेतल्यानंतर दिसून न आल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्यांची पोलीस स्टेशन पिंजर येथे तक्रार दिली. त्यातही पिंजर पोलीस स्टेशनचे कर्मचारी या प्रकरणात लक्ष देत नव्हते. त्यावेळी सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या काही सरपंच संघटनांनी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शेख आयुब याचा शोध घेण्याची विनंती केली.

जर वेळीच शोध न लागल्यास सर्व तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सरपंच हे उपोषणाला बसतील असा इशारा देखील दिला होता. त्यानंतर पोलीस प्रशासन कामाला लागले. आणि 30 डिसेंबर रोजी शेख अफान यांचा मृतदेह गावाबाहेरील एका विहिरीत आढळून आला. गेल्या तीन दिवसापासून शेख अफान यांच्या कुटुंबियांचे काय हाल होत आहेत हे शब्दात सांगणे कठीण झाले. शेख अफान हा वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी व या दुःखातून सावरण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय अंजलीताई आंबेडकर जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे, बार्शीटाकळी तालुक्याचे कार्याध्यक्ष गोरसिंग भाऊ राठोड, महिला बालकल्याण सभापती रिजवाना ताई परविन व शेख मुख्तार भाई वंचित बहुजन आघाडीचे नेते व पिंजरचे सरपंच अशोकराव लोणाग्रे, शुद्धोधन इंगळे, पिंजर सर्कल अध्यक्ष संदीप सराटे, ता प्रशिद्धी प्रमुख मिलिंद करवते हे उपस्थित होते. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना या दुःखातून सावरण्याची हिम्मत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय अंजली ताई आंबेडकर यांनी दिली , यानंतर कोणतीही अडचण आल्यास वंचित बहुजन आघाडी सदैव तुमच्या पाठीशी आहे असा धीर दिला

Leave a Reply

Your email address will not be published.