
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंह साहेब यांचे आदेशानुसार शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला व संपूर्ण जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत (Tinted Glasses/Black film) काळे काच लावलेले चारचाकी वाहनांवर कलम १०० (२)/१७७ मोवाका प्रमाणे नियमांचे उल्लंघन करणारे वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता संपुर्ण अकोला जिल्हयात दिनांक २३/०१/२०२४ ते २८/०१/२०२४ दरम्यान विशेष मोहीम राबवीण्यात आली.
सदर मोहीम दरम्यान शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मधील वाहतुकीचे काम पाहणारे पोलीस अमंलदार यांचे मार्फत (Tinted Glasses/Black film) काळे काच लावलेले चारचाकी वाहनांवर कलम १००(२)/१७७ मोवाका अन्वये एकुण ५०४ केसेस करून १,३४,०००/- रू दंड आकारण्यात आला असुन त्यापैकी १,०५,५००/- रू दंड वसुल करण्यात आला
आहे..
करीता नागरीकांनी वाहन चालवितांना चार चाकी वाहनांचे काचावर डार्क काळी फिल्म लावु नये तसेच वाहनांचे कागदपत्रे सोबत बाळगावे, वाहतुक नियमांचे पालन करावे व आपले वाहनावर पेंडीग दंड असल्यास त्वरीत वाहतुक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन मा. श्री. बच्चन सिंह साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोल जिल्हयातील नागरीकांना केले आहे.