
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंग साहेब यांचे संकल्पनेतुन व त्यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला व अकोला जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत ऑटो रिक्षा अतिरिक्त प्रवासी वाहतुक करणारे ऑटो चालक यांचेवर कलम १९४ A मोटार वाहन कायदा प्रमाणे कार्यवाही करण्याकरीता संपुर्ण अकोला जिल्हयात दिनांक १५/०४/२०२४ ते २०/०४/२०२४ दरम्यान विशेष मोहीम राबवीण्यात आली होती.
सदर मोहीमे दरम्यान शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचेकडुन ऑटो रिक्षा अतिरिक्त प्रवासी वाहतुक करणारे ऑटो चालक यांचेवर कलम १९४ A मोवाका अन्वये एकुण ६६१ ऑटो वाहनांवर केसेस करून १,३६,४००/- रू दंड आकारण्यात आला असुन त्यापैकी ९३,२०० रू दंड वसुल करण्यात आला आहे.
तसेच माहे जानेवारी/२०२४ पासुन अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री. बच्चन सिंग साहेब यांचे संकल्पनेतुन व त्यांचे मार्गदर्शनात कर्कश व मोठ मोठे आवाज करून फटाके फोडणारे बुलेट वाहन चालाकांवर बनावटी सायलेन्सरची विशेष मोहीम घेवुन मोवाका अन्वये कार्यवाही करून शहर वाहतुक शाखा येथे ५० बनावटी सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. सदर सायलेन्सर नष्ट करण्याकरीता मा. वि. कोर्ट यांची परवानगी घेवुन, मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे मान्यतेने व त्यांचे उपस्थितीत दिनांक २२/०४/२०२४ रोजी दुपारी १२.०० वा शहर वाहतुक नियंत्रण शाखा, जुने पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला समोरील आम रोडवर जप्त असलेले ५० बनावटी बुलेट सायलेन्सर रोड रोलर व्दारे नष्ट करण्यात येणार आहे. तरी सर्व प्रिन्ट मिडीया व इलेक्ट्रीक मिडीया अकोला जिल्हा यांनी उपस्थीत राहावे.
करीता वाहन धारकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे, वाहन चालवितांना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे व आपले वाहनावर पेंडीग दंड असल्यास त्वरीत वाहतुक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे दंड भरावा, असे आवाहन मा. श्री. बच्चन सिंग साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांनी अकोल जिल्हयातील नागरीकांना केले आहे.