नागरिकांना ‘डिजीटल अरेस्ट’ या सायबर गुन्हयापासुन रहा जागरूक !

आजच्या युगात इंटरनेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दैनंदिन जीवनातले बरेच व्यवहार आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून पार पडले जातात. जसे की आर्थिक व्यवहार, बैंकिंग, व्यावसायिक, शैक्षणिक, वैद्यकीय व जनसंपर्क इत्यादी. इंटरनेट माध्यमाने मानवी जीवन सुलभ झाले आहे हे जितके खरे तितकेच याच्या वापराबाबतव्या अपुन्या माहितीने ते धोक्यातही आले आहे. सायबर गुन्हेगार याच उणीवांचा फायदा उठवून इतरांचे आर्थिक व सामाजिक नुकसान करतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर सुरक्षितरित्या करणे हि काळाची गरज आहे.

सद्यास्थितीत सायबर गुन्हयांमध्ये डिजिटल अरेस्ट या नावाने नागरिकांची फसवणुक करण्यात येत आहे. म्हणुन नागरिकांनी जागृत होणे गरजेचे आहे.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?

डिजिटल अरेस्ट हा एक सायबर फ्रॉडचा नवा प्रकार आहे. यात सायबर भामटे आपल्याला पोलीस, सीबीआय, ईडी, कस्टम किंवा इन्कम टॅक्स वा अमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करीत पीडीत व्यक्तीला कॉल करतात. नंतर त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबियांवर अनैतिक कामात सामील असल्याचा आरोप करतात. त्यानंतर फ्रॉड करणारे व्हिडीओ कॉल करण्याची मागणी करतात. साधा कॉल अथवा व्हिडीओ कॉल करून अटक करण्याची भीती दाखवतात. नंतर पीडीत व्यक्तीला खोटी कागदपत्रे दाखवून किंवा खोटे ओळखपत्र दाखवून घाबरवले जाते. त्यांना अटकेची कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्यासाठी दबाव टाकला जातो.

डिजिटल अरेस्ट हि खरी असते का ?

जर तुम्हाला डिजिटल अरेस्ट म्हणजे कळले असेल तर वास्तविक ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणती गोष्ट नसते. या धमक्या संपूर्णपणे खोटया असतात. त्यांचा हेतू पीडीत व्यक्तीकडून लवकरात लवकर ऑनलाईन पध्दतीने पैसे लुबाडण्याचा असतो. त्यामुळे पोलिस असल्याची बतावणी करुन पीडीत व्यक्तीला घाबरवले जाते आणि तणावाखाली आणले जाते.

डिजिटल अरेस्टची ओळख :-

तुम्हाला अचानक कोणत्यातरी अनोळखी नंबरवरून कॉल येतो. कॉल करणारा स्वतःला पोलीस, ईडी किंवा सीबीआय अधिकारी असल्याचे सांगतो. तुम्हाला कोणत्यातरी गुन्ह्यात गुंतले असल्याचा आरोप केला जातो. तुम्हाला अटक होईल अशी धमकी दिली जाते. तुम्हाला पैसे देऊन अटक टाळण्यासाठी सांगितले जाते. कॉल दरम्यान तुम्हाला भिती दाखवल्या जाते.

डिजिटल अरेस्टपासून कसे वाचावे?

१. अशा प्रकारचे कॉल येतात तेव्हा शांत राहा. २. कॉल करणाऱ्याला तुमची ओळख देऊ नका. ३. त्यांच्या मागणीनुसार कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नका. ४. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना याबद्दल सांगुन जागृत करा. ५. अनोळखी लिंक्सवर क्लिक करणे टाळा तसेच त्यांचे सांगणेप्रमाणे कोणत्याही प्रकारचे अॅप्लीकेशन किंवा apk फाइल इंस्टॉल करू नका. ६. कोणतेही पोलीस तुमच्याकडून कधीही फोनवर पैसे मागणार नाही. ७. असा फोन आल्यास प्रत्यक्ष पोलीस ठाणेत येण्याचा आग्रह धरावा. ८. कोणत्याही प्रकारच्या धमकीला बळी पडू नका. ९. अशा घटनांमध्ये शक्यतो (skype app) ‘स्काईप’ अॅप डाउनलोड करायला सांगितले जाते, ते अजिबात करू नका. १०. कोणत्याही अनोळखी कर्माकावरून आलेल्या व्हिडीओ कॉलला प्रतिसाद देवू नका

तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही कायदेशीर व्यवस्था नाही ही केवळ फसवणूक आहे यासाठी आपण अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये. फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर १९३० किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाइट तकार नोंदवावी.

Leave a Reply

Your email address will not be published.