सकल हिंदू समाज अकोला यांची मागणी

अकोला:-सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन करण्यात येते की, ज्या क्रूर आक्रांता औरंगजेबनी आपल्या भारत भुमीवर आक्रमण केले, हिंदूचे धर्मान्तरण केले, असंख्य हिंदूची व लहान लेकरांची अमानवीय कत्तले केली त्यानी हिंदू महीलांवर सामूहिक दुष्कर्म करण्याचे फतवे देऊन त्याची निर्मम हत्या केली. मंदिरे तोडुन त्या मंदिरांवर मशीदि बांधली व मंदिराचे सोने चांदी, किंमती जेवरात लुटुन इसलामचे प्रचार केले। याला प्रतिउत्तर देण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी देव, देश आणि धर्माचे रक्षणाचे कार्याला मराठ्याची सेना तैयार केली व देशाचे रक्षणाचे कार्य केले हेच कार्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ही केले. परंतु धोक्याने संभाजी राजेना बंदि बनवुन त्यांच्यावर निरंतर चाळिस दिवस अत्याचार करुन त्यांची निर्मम हत्या करण्यात आली व त्यांचे अंतिम संस्कार हिंदू पद्धतिने होऊ नये म्हणून त्यांचे शरीराचे टुकडे करुन फेकण्यात आले. हि हत्या मानवतेला शर्मसार करणारी व हिंदूचे खुन खवलणारी अशी हत्या आहे. अश्या क्रुर औरंग्याची कबर आपल्या महाराष्ट्राच्या मातीला लागलेला एक कलंक आहे. आज ही त्याची कबर असने म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाचा अपमान आहे. हिंदूचे जखमावर मीठ छिडकणारी बाब आहे. म्हणून आमच्या राजेचा हत्याऱ्याची कबर संभाजी नगर मधुन काढून टाकावी अशी सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले,
निवेदक,
१)उमेश लक्खन,मयूर गुर्जर,संदीप बाथो,तुषार गोतमारे,ॲड पावस सेंगर,संग्राम खांझोडे,आकाश ठाकरे यांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.