
आज दिनांक 29/03/2023 रोजी प्रहार बहुउद्देशीय संस्था आस्टूल यांच्या कार्यालयात प्रहार संस्थेचे अध्यक्ष अमोल प्रकाश करवदे यांच्या उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे यावर्षी चक्रवर्ती राजे सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळीकार्यक्रमाचे अध्यक्ष – नारायण वाळी यांनी चक्रवर्ती राजे सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचं पूजन करून हारअर्पण पुष्पगुच्छ करून चक्रवर्ती सम्राट अशोक यांना त्रिवार वंदन केले.
यावेळी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आशिष दाभाडे यांनी सुद्धा चक्रवती राजे अशोक सम्राट यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ, पूजन करून त्रिवार वंदन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण बजर,त्रिरत्न इंगळे,रत्नदीप उपर्वट,धीरज शिरसाट,आकाश कहाळे, श्रीराज राऊत,आशिष राव,विजेंद्र इंगळे,राहुल करवते,स्वप्निल इंगळे,पंकज भारसाकडे,निलेश कहाळे,निशिकांत गाडगे,यांनी सुद्धा चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.