
स्थानिक : अकोला
दि. ८ नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काकासाहेब झ्याबुजी शिरसाट मार्ग या ऐतिहासिक पाटीचे भीम नगर येथील प्रतिष्ठित नागरिक व महिला संघ यांनी त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करून पाटीचे अनावरण करण्यात आले.
या बाबीला एक ऐतिहासिक घटना आहे. काकासाहेब झ्याबुजी शिरसाट यांनी ९ आणि १० डिसेंबर १९५४ मध्ये शेड्युल कास्ट फेडरेशन वऱ्हाड प्रांत सभा या दिवशी घेऊन बाबासाहेबांना अकोला जिल्ह्यात सर्वप्रथम आणून फाटे ग्राउंड येथे जाहीर सभा घेण्यात आली होती या सभेची मिरवणूक सकाळी नऊ वाजता भीम नगर जुने शहर मधून वाजत गाजत काकासाहेब झ्याबुजी शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली, मिरवणूक भीम नगर मध्ये आली त्यावेळेसचे सर्व सहकारी मंडळी मिरवणूक घेऊन फाटे ग्राउंड,सध्याच्या जनता मार्केट जुने बस स्टँड च्या बाजूला त्यावेळेस संपूर्ण पटांगण होतं त्या पटांगणामध्ये मैदानामध्ये खुल्या जागेमध्ये भव्य सभा १० डिसेंबरला घेण्यात आली.

काकासाहेब झ्याबुजी शिरसाट यांच्यामुळेच बाबासाहेब अकोला जिल्ह्यात भीम नगर मध्ये उपस्थित झाले. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भीम नगर हे भूमी आहे, काकासाहेब झ्याबुजी शिरसाट यांच्यामुळे आमच्या या भूमीला भीम नगरला बाबासाहेबांचे स्पर्श झाले,त्याच भूमीत आम्ही सुद्धा जन्मलो आम्ही हे आमचे भाग्य समजतो त्याच महान भूमीत काकासाहेब झ्याबुजी शिरसाट यांची पाटी बाबासाहेबांच्या हयातीत लावण्यात आली होती. ७५ वर्षांचा काळ होऊन गेला आता हे काचाची संगेमरमरची नवीन पाटी, बसवण्यात आली ऐतिहासिक ठेवा जपून ठेवण्यासाठी व येणाऱ्या पिढीला,बाबासाहेबांना अकोल्यात कोणी आणलं हे जिवंत ठेवण्यासाठी हे पाटी आम्ही पुन्हा तयार केली. ज्या काकासाहेब झ्याबुजी शिरसाट यांच्यामुळे अकोला जिल्ह्यातील, आजूबाजूंच्या चार-पाच जिल्ह्यातील नागरिकांना बाबासाहेबांचे दर्शन स्वतःच्या डोळ्याने पाहण्याची संधी कानाने ऐकण्याची संधी काकासाहेब झ्याबुजी शिरसाट यांच्यामुळेच मिळाली. हा ऐतिहासिक ठेवा प्रत्येकांना जपून ठेवावे हेच आम्ही आव्हान सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट यांनी केले.
तेव्हा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चंदू दादा श्रावण शिरसाट,गट्टू पहिलवान शिरसाट,वासुदेव शिरसाट,मनोज दादा शिरसाट,तपासून भाऊ मानकीकर,अविनाश शिरसाट, पंकज इंगोले,रोशन भाऊ शिरसाट,सनी बोदडे,संजय पाटील,सनी शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.