शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती


 
         शिवाजी महाविद्यालयात ‘ज्ञानोत्सव स्नेहसंमेलना’चा विविध स्पर्धांच्या उद्‍घाटनाने प्रारंभ


         भारताचे पहिले कृषिमंत्री शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त ज्ञानोत्सव स्नेहसंमेलन दिनांक १७,१८ व १९ जानेवारी २०२४ या तीन दिवसात साजरे होणार आहे. या उत्सवाची सुरूवात सकाळी डॉ. भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यांला हारार्पण करून करण्यात आली. तद्‌नंतर मंचावरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. भाऊसाहेबांच्या प्रतिमांचे पूजन, हारार्पण प दीपप्रज्वलन करून कार्यक्रला सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अंबादास कुलट होते तर विशेष अतिथी म्हणून विलास हरणे, व्‍यवस्थापक, छत्रपती कॉन्व्‍हेंट, अकोला, मा.महादेवरावजी भुईभार, माजी अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे होते. प्रमुख उपस्थितामध्ये डॉ. सहदेवराव रोठे, तसेच प्रमुख उपस्थितामध्ये  श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजिवन सभासद प्रा.उषा जगताप, प्रा.केशवराव खांडेकर, डॉ.पी.एस.वाटाणे हे होते. त्याचप्रमाणे डॉ.अंजली देशमुख, डॉ.प्रतीक्षा कोकाटे, डॉ.किशोर देशमुख, समन्वयक जयंती उत्सव, प्रा.अनीता दुबे, सहसमन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती.



विविध स्पर्धांचे उद्‌घाटन करण्यात आले.
रांगोळी स्पर्धा : कृषिदर्शन या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच्या समन्वयका डॉ.मोनाली म्हसाळ ह्या होत्या यामध्ये उत्फूर्त सहभाग विद्यार्थ्यांनी नोंदविला.
रक्तदान शिबीर: रक्तदान हे सर्वश्रष्ठ दान आहे, त्यामुळे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सावानिमित्त रक्तदान करून विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. याचे समन्वय डॉ.रवी दाभाडे हे होते. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकूण ८० बॉटल रक्तदान केले. डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती यांनी रक्त संकलन केले.

शालेय विज्ञान प्रदर्शनी : परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांना विज्ञान साहित्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्य शाळेच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीचा आनंद घेतला. या प्रदर्शनीचे समन्वयक डॉ.संतोष बदने हे होते. इत्यादी स्पर्धांसोबत पाककृतीची सजावट स्पर्धा, पोस्टर व कोलाज स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्विज स्पर्धा, एकांकिका आदींचे उद्‍घाटन संपन्न झाले. एकांकिका स्पर्धेला ज्येष्ठ नाट्यकमी प्रा.मधू जाधव हे उद्‍घाटक म्हणून उपस्थित होते.

विशेष आकर्षण म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालात पाहूण्यांचे स्वागत केले. राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांनी सुरक्षेमध्ये आपली भूमिका बजावली. परिसरात डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवन प्रसंगांची मोठ-मोठी बोर्ड लावण्यात आली आहेत.


*

Leave a Reply

Your email address will not be published.