दि. 10 ऑक्टोंबर 2023 रोजी श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे मानसशास्त्र विभागातर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे आयोजन मानसशास्त्र विभागाचे डॉ. संतोष पस्तापुरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानव्यविद्या शाखा प्रमुख डॉ.नाना वानखडे , प्रमुख उपस्थिती म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आनंदा काळे प्रा.निलेश गावंडे, डॉ.शिवाजी काळे,अनिल फाले उपस्थित होते. आधुनिक जीवनशैलीचा व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो असे विचार व्यासपीठावरून डॉ. आनंदा काळे यांनी व्यक्त केले. व तसेच मन आणि शरीर ह्या एकाच दोन बाजू आहेत.मनावर आघात झाला असेल तर त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो आणि शरीरावर आघात झाला असेल तर त्याचा विपरीत परिणाम मनावर होतो या दोघांचे समतोल राखणे ही आज काळाची गरज आहे असे विचार डॉ. संतोष पस्तापुरे यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय भाषण करताना डॉ.नाना वानखडे यांनी मानसिक आरोग्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
तेव्हा खुशी वाघ, एकता शिरसाट, अजय वैराळे,विशाल गोलाईत,तुषार चव्हाण, सोमेश अवचार, रीचिका सरदार, कांचन अवचार, अरविंद अंभोरे, वैभव आगलावे, वैष्णवी काकडे, मोनिका सरोदे,निशा हिवराळे, जरीना शेख, महक, सपना, मोहम्मद समी, शेख तालीब हुसेन इत्यादी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना रत्नपारखी हिने केले तर आभार प्रदर्शन अरविंद अंभोरे यांनी केले.