
उत्कृष्ट प्राचार्य म्हणून डॉ रामेश्वर भिसे तर उत्कृष्ट समन्वयक म्हणून प्रा. तुषार देशमुख यांची निवड.

स्थानिक/अकोला
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सूरू “करिअर कट्टा”राज्य स्तरीय स्पर्धा मध्ये अकोला जिल्ह्यातून श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील प्राचार्य म्हणून डॉ रामेश्वर भिसे यांना उत्कृष्ट प्राचार्य तर प्रा.तुषार देशमुख यांना उत्कृष्ट महाविद्यालय समन्वयक प्रथम पुरस्कार प्राप्त
श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील सुरू असलेल्या करिअर कट्टा या विभागाद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, संशोधन, रोजगार- स्वयंरोजगार ,उद्योग ,युवा नेतृत्व, व्यक्तीमत्व विकास ,युवा संसद असे अनेक कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबविण्यात आले. व विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे
महाविद्यालयाने केलेल्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्यावतीने अकोला जिल्ह्यातून श्री शिवाजी महाविद्यालयाला प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये पुस्तक प्राचार्य म्हणून डॉ रामेश्वर भिसे व करिअर कट्ट्याचे समन्वयक प्रा तुषार देशमुख यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले
महाविद्यालयाला पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.ना.श्री हर्षवर्धन देशमुख यांनी दोघांचे अभिनंदन केले. सोबतच महाविद्यालयातील
सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी कडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.