स्थानिक: तारफाईल अकोला येथील प्रज्ञा विकास मंडळ बौद्ध विहाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर सुद्धा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेणबत्ती अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रज्ञा विकास मंडळ बौद्ध विहार तारफाईल या ठिकाणी दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता सामुदायिक बुद्ध वंदना घेवून आदरांजली वाहिली जाईल. त्याचप्रमाणे सायंकाळी ठीक 6 वाजता मेणबत्ती अभिवादन रॅलीला सुरुवात होईल. त्यासाठी सर्व नागरिकांनी मेणबत्ती अभिवादन रॅलीत उपस्थित रहावे ही विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.