बौद्ध समाज संघर्ष समितीची महागाव येथील दलीत वस्तीतील अतिक्रमण कारवाईच्या विरोधात समितीचा आक्रमक पवित्रा..

स्थानिक: बार्शीटाकळी

आज बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथे हायकोर्टाच्या निर्णयानुसार महसूल प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन,पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनात महागाव येथील अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्याची सुरुवात करण्यात आली होती. करण्यात आली यावेळी बौद्ध समाज संघर्ष समितीला माहिती मिळतात बौद्ध समाज समितीचे पदाधिकारी महागाव येथे पोहोचून तहसील महसूल प्रशासन पोलीस प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन यांच्याशी चर्चा करून कारवाई केली त्या कारवाईला आम्ही विरोध करत नसून न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही पालन करणारे लोक आहोत परंतु ४० ते ५० वर्षापासून राहत असलेल्या लोकांना अतिक्रमणधारक म्हणून त्यांचे घर पाडणे ही कारवाई सुरू बुद्धीची आहे. या कारवाईला आळा बसावा म्हणून त्यांच्याकडे असलेले निमा कुलचे जी फॉर्म त्यांना मिळालेले घरकुले इंदूर आवास योजना या सर्वांची माहिती घेऊन ती माहिती प्रशासनाला देऊन कारवाई थांबवण्याचे आव्हान आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल यांना केले त्यानुसार त्यांनी कागदपत्र होऊन कारवाई केली आणि ज्या लोकांचे घरी आहेत त्या लोकांचे घरे येणाऱ्या 15 ते 20 दिवसात निमा कुल करून त्यांना ंत देण्याची कारवाई आम्ही पुढील पंधरा वर्षात करू अशी आश्वासन तहसीलदार ग्रामपंचायत यांनी बौद्ध समाज संघर्ष समितीला देऊन सहकार्य केले.

यावेळी बौद्ध समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गजाननभाऊ कांबळे, सचिव अश्वजीत शिरसाट, संपर्कप्रमुख जीवन भाऊ डिगे, ज्येष्ठ मार्गदर्शक तपसू मानकीकर, सिद्धार्थ भाऊ वरोटे,राजकुमार शिरसाट,आरजे गौरव डोंगरे, आदेश इंगळे, संकेत कांबळे, अमोल जामनिक, सचिन पालकर, कमलेश कांबळे, रवी जाधव, विजय प्रधान, यांचे सह बौद्ध समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी सदस्य सर्व उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.