नालंदा नगर येथे बुद्ध जयंती साजरी…!

अकोला : – स्थानिक नालंदा नगर येथे समस्त विश्वाला शांती, मैत्री, करुणा, बंधुता, समता, न्याय व मानवतेची शिकवण देवून माणसाला दुःख मुक्त करण्याचा मार्ग दाखविणारे जगातील महान वैज्ञानिक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ५ मे २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु.एम.के.अवचार साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.एम.आर.इंगळे, पोलीस जमादार राजू गणवीर उपस्थित होते. सर्वप्रथम महाकारुनिक तथागत बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पाहुण्याचे हस्ते पुष्प, हारार्पण व दीपप्रज्वलन आणि पंचरंगी ध्वजारोहण करण्यात आले. सामुदायिक त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या प्रसंगी प्रा.डॉ.एम.आर. इंगळे यांनी आपले विचार व्यक्त करतांना बुद्धाच्या शिकवणूकीतच माणसाचे सुख आहे म्हणून बुद्धाच्या विचाराचे आचरण केले पाहिजे असे सांगितले. त्यानंतर आयु.एम.के. अवचार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. राजू गणवीर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयु. सुनील गणवीर यांनी केले. या कार्यक्रमाला नालंदा नगरातील सर्व उपासक, उपासिका तथा समस्त महिला, नागरिक व बाल बालिका उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.