
प्राचार्य डॉ. रामेश्वर मा.भिसे अकोला दि. २० …..महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय छात्र सेनेत सहभागी होऊन सर्वोत्कृष्ट समजल्या जाणा-या रिपब्लिक डे’ कॅम्प परेडमध्ये ऑल इंडिया परेड कमांडर म्हणुन अकोला जिल्हयाचे नेतृत्व करणे ही आम्हा सर्वाकरिता अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवद्गार श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी देशमुख यांनी
काढले.११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफीसर कर्नल व्ही. एन. शुक्ला, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, एन.सी. सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. आनंदा काळे, लेफ्टनंट अश्विनी बलोदे, बटालियनचे सुभेदार मेजर संपूर्ण, पी.आय. स्टाफ यांच्या मार्गदर्शनातुन माहे ऑगष्ट महिन्यापासून सुरू झालेली सराव परेडमध्ये यश प्राप्त करून महाविद्यालयाच्या एन. सी.सी.युनिटचे ज्युनिअर अंडर ऑफीसर सुमीत पथरोड आणि आनंद खोडे हयांनी आरडीसी परेडच्या अंतिम यादीत आपले स्थान कायम ठेवले. दि. २६ जाने. २०२५ च्या नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक परेडमध्ये आनंद खोडे हे ऑल इंडिया एन.सी.सी.परेडचे कमांडिंग ऑफीसर म्हणून नेतृत्व करणार आहेत. तर याच महाविद्यालयाचे दुसरे कॅडेट सुमित पथरोडहे पंतप्रधान बॅन्ड पथकमध्ये अकोला जिल्हयाचे नेतृत्व करणार आहेत.
विद्यार्थी हा मातीच्या ओल्या गोळ्याप्रमाणे असतो, त्याला जसा आकार द्याल तसा तो घडत जातो. बहुजन समाजातील काही विद्यार्थी आपल्या विपरित परिस्थितीवर मात करित आपले उद्दिष्ट, उचित यशोशिखर गाठतात. शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ज्ञानगंगा घरोघरी आणि बहुजन समाजातील शेतकरी शेतमजुरांच्या मुलांकरिता शिक्षणाची द्वारे खुली केल्यामुळेच आज हे एनसीसी कॅडेट्स आपल्या युनिटचे, महाविद्यालयाचे, बटालियनचे, ग्रुप हेडक्वार्टर अमरावतीचे व आपल्या अमरावती विभागाचे नांव आज उज्वल करू शकले.
अकोला शहरातील आनंद खोडे आणि सुमित पथरोड ह्या एनसीसी कॅडेटचे खास वैशिष्ट म्हणजे हे दोघेही गरीब कुटुंबातुन पुढे आलेले आहेत. आनंद खोडे यांचे दहावी पर्यन्तचे शिक्षण भिकमचंद खंडेलवाल शाळा, डाबकी रोड, अकोला येथुन झाले तर सुमित पाथरोड हयांचे निवास देशमुख फाईलमध्ये असुन त्यांचे पुर्ण शिक्षण श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये झालेले आहे. राजपथ-२०२५ पर्यन्त पोहोचलेले दोन्ही कॅडेटचे वडील अकोला महानगरपालिका येथे सफाई कामगार म्हणून मागील २० वर्षापासून काम करित आहेत.
श्री शिवाजी महाविद्यालयाचे एनसीसी युनिट आजरोजी ११० छात्रांना प्रशिक्षण देत आहे. ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला येथील कमांडिंग ऑफीसर, प्रशासकीय अधिकारी आर्मी, पीआय स्टाफ आणि विविध शाळा, महाविद्यालयाचे एनसीसी ऑफीसर ह्या कॅडेट्सला त्यांच्या नियोजित अभ्यासक्रमाप्रमाणे प्रशिक्षण देत आहेत.
श्री शिवाजी महाविद्यालय अकोलाचे एनसीसी ऑफीसर कॅप्टन डॉ. आनंदा काळे आणि लेफ्टनंट डॉ अश्विनी बलोदे, प्रा. सचिन भुतेकर आणि एनसीसी युनिटमधील सिनिअर छात्र कॅडेट्सला नियमित प्रशिक्षण देत असतात.आतापर्यन्त श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथुन भारतीय सैन्यदलामध्ये भारतमातेच्या संरक्षणाकरिता उत्सर्जुतपणे कॅडेट राहुल तिवारी, निखिल ढगे, ऋषिकेश विश्वकर्मा, शुभम ढोकणे, भिमभुषण तिडके, महेश खंडारे, सिध्दांत सदार, प्रणय क्षीरसागर, तन्वीरखान, अरविंद वारके, सोनाली जगताप, प्रिती ताठे, विनायक सदाशिव, अक्षय ढोरे, सुयश जडीये, वैभव गावंडे, अक्षय महल्ले, शुभम मालटे, सागर मालटे, मंगेश इंदौरे, अवधुत मोरे, पंकज चदिकर, पवन उमाळे, कुंदन तायडे, संदेश दंदी, विशाल जंगले, श्रीकांत माळी, रोशन वाघ, गजानन थोरात, प्रज्वल पेंढारकर, चंदनकुमार गवई, आचल यादव, शहाजानखान, भुषण डांगे, भुषण तिडके, प्रमोद मोरे श्रीकांत माळी अरविंद वारके आदी कॅडेट विद्यार्थी इंडियन आर्मीमध्ये जनरल सोल्जर म्हणुन आपली सेवा देत आहेत.
वैशिष्टयेः (१) अकोला महानगरपालिका सफाई कामगारांचे मुले, दिल्ली येथील प्रजासत्ताक २०२५ चा राजपथ परेडवर अकोला जिल्हयाचे नेतृत्व करित आहेत. (२) आनंद सोडे हे वाल्मिकीनगर, डाबकी रोड, अकोला येथे राहणारे असून ऑल इंडिया एनसीसी परेडचे कमांडर म्हणून नेतृत्व करित आहेत. (३) सुमित पद्मोड यांचे पुर्ण शिक्षण श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये सुरू आहे. त्यांना डूमसेट, तबला, ढोलक, अॅफ्टीपेंड क्लॅप बॉक्स, उत्कृष्ट प्रकारे हाताळतात. (५) संगीत विभागात उत्कृष्ट गायनाचे धडे प्रा. हर्षवर्धन मानकर, संगीत विभाग, मांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहेत.