बोरगाव मंजू येथे बौद्ध वस्तीवर हल्ला : एकतर्फी कारवाईविरोधात भीमसैनिकांचा एल्गार!

बोरगाव मंजू (अकोला) — बोरगाव मंजू येथील सिद्धार्थ नगरमधील बौद्ध वस्तीवर काही जातीयवादी लोकांकडून अचानक दगडफेक व गोटेमार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांना सोडून देत, बौद्ध समाजातील शिक्षण घेणाऱ्या निष्पाप तरुणांवरच पोलीसांनी गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप स्थानिक भीमसैनिक आणि बौद्ध संघर्ष समिती कडून करण्यात आला आहे.

🧒 शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळीच उचललं, पोलिसांचा एकतर्फी पक्षपात?
बुध्द वस्तीतील काही युवक सिद्धार्थ नगर परिसरात असताना, पोलीसांनी कोणताही ठोस पुरावा नसताना त्यांना सकाळीच ताब्यात घेतलं. यावर संतप्त समाजबांधवांनी जेव्हा पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा पोलीस ठाणेदार गोपाळ साहेब यांनी थेट सांगितलं – “मी तुमच्या बौद्ध समाजाचा रिपोर्ट घेत नाही, वरून आदेश आहेत.”

🗣️ ठाणेदाराची वादग्रस्त वागणूक? – “तुमच्या कडून काही होणार नाय, करा जे करायचंय?
रिपोर्ट घेतला जात नसल्यानं समाजात तीव्र संताप उसळला. हा पोलिसांकडून थेट संविधानाचा आणि कायद्याचा अपमान आहे, असा आरोप होत आहे. कोणत्याही तपासाआधीच बौद्ध समाजालाच गुन्हेगार ठरवणं हा खुलेआम अन्याय आहे.

👮 SP कार्यालयावर निवेदन – ‘एकतर्फी गुन्हे थांबवा!’
दुसऱ्या दिवशी अकोला येथील पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयावर भीमसैनिक आणि कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं. यामध्ये पोलिसांची भूमिका एकतर्फी असल्याचं ठामपणे मांडण्यात आलं. हल्लेखोरांवर कारवाई नाही, पण बौद्ध तरुणांना गुन्हेगार ठरवलं जातंय – ह्याला काय म्हणायचं? असा संतप्त सवाल करण्यात आला.

✊ “पोलीस ठाण्यावर धडक!”
नंतर बोरगाव पोलीस स्टेशन गाठून निषेध करण्यात आला. “सर्व समाजाला समान न्याय मिळावा,” ही प्रमुख मागणी. जय भीम! जय संविधान! या घोषणा थेट पोलीस ठाण्यात घुमल्या. समाजाची एकजूट आणि कायदेशीर दडपशाहीविरोधातील भूमिका पाहून प्रशासनाला माघार घ्यावी लागली.

👥 या लढ्यात पुढील प्रमुख नेतृत्वाची भूमिका
यामध्ये आकाश शिरसाट, जीवन डीगे (बौद्ध संघर्ष समिती), अ‍ॅड. देवानंद गवई (कायदेशीर सल्लागार), गजानन कांबळे, अश्वजीत शिरसाट, महेंद्र डोंगरे, विजय जामनिक, पराग गवई, अ‍ॅड. प्रदीप गवारगुरु, निल सोनवणे, संतोष इंगळे (भीम आर्मी), रोहित शेगावकर आदींसह महिला मंडळ आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


🟦 “हे प्रकरण केवळ एका गावापुरतं मर्यादित नाही. ही घटना संविधानाच्या संरक्षणात असलेल्या समाजावर झालेला हल्ला आहे. बौद्ध समाजाला टार्गेट करणं आणि कायद्याचा वापर पक्षपातासाठी करणं ही गंभीर बाब आहे. यावर सखोल चौकशी झाली पाहिजे, आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.!”– आकाश शिरसाट(सम्राट अशोक सेना)

Leave a Reply

Your email address will not be published.