बोरगाव मंजु जिल्हा परीषद सर्कल च्या जि.प.सदस्या सौ.निता संदिप गवई यांच्या निधीअंतर्गत 1 कोटी 43 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भुमिपुजन तथा वंचित बहुजन आघाडीमध्ये शेकडो युवकांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा युवकांचे प्रेरणास्थान आद.सुजातदादा आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करताना त्यांनी देशात होणारे जातीपातीचे राजकारण ,शेतकऱ्यांची पिळवणूक ,ईडी व सिबीआय सारख्या शासकीय यंत्रणांचा गैरवापर,अल्पसंख्यांक समुदायावर होणारे अत्याचार ईत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले व सर्वांच्या समस्या जानुन घेतल्या.कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.प्रमोदभाऊ देंडवे ,जिल्हामहासचिव मा.मिलींदभाऊ ईंगळे , जि.प.अध्यक्षा मा.संगीताताई अढाऊ , अकोला पुर्वचे तालुकाध्यक्ष मा.किशोरभाऊ जामनिक , बोरगाव मंजुच्या पं,स.सदस्या छायाताई वानखडे ,जि.प्रशिध्दीप्रमुख विकासभाऊ सदांशिव , ग्रापं अन्वि चे सरपंच प्रदिपभाऊ नवलकार , ग्रापं बोरगाव मंजुच्या उपसरपंच बेबिनंदाताई गवई , ग्रापं वाशिंबा च्या उपसरपंच उषाताई वानखडे , ता.कोषाध्यक्ष नितीनभाऊ गवई ,मा.जि.प.सदस्य डाॕ.रफीकसाहेब , मा.पं.स.सदस्य अशोकभाऊ तायडे , मा.पं.स.सदस्य राजुमियाॕ देशमुख, मा.पं.स.सदस्य नितीनभाऊ म्हैसने , बोरगाव मंजु चे सर्कल अध्यक्ष विशालभाऊ ईंगोले वसिमभाई शाह , महासचिव शे.सलीमभाऊ , निलेश वानखडे , युवक आघाडीचे अध्यक्ष आकीब पटेल, स्वप्निलभाऊ सिरसाठ , ग्रा.पं.सदस्य समिउल्ला शाह,ग्रापं सदस्य रशिदभाई ,अत्तुभाई ,मुख्तार भाई नितेश गवई , युसुफ शाह , योगेशभाऊ तायडे ,प्रविन ईंगळे ,बुध्ददास गवई ,राहुल तायडे , अमरदिप तायडे,लालाजी गवई ,देवानंद गवई ,विजय बागडे,प्रदिप गवई , रुपेश वानखडे , रोशन गवई , अमरदिप तायडे ,आकाश तायडे ,शुभम तायडे , वंचित बहुजन आघाडीचे सर्व आजी माजी पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमरदिप सदांशिव यांनी केले तर सौ.निताताई गवई व वंचित बहुजन आघाडीच्या जि.प. आणि पं.स.सर्कल च्या सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.