
पुसद :बोधगया हे जगातील सर्व बौध्दांचे पवित्र स्थान आहे एवढेच नव्हे तर ही बहुजनांची विरासत आहे या ठिकाणी तथागत गौतम बुध्दांना संबोधी प्राप्त झाली होती.हे महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती.हे पवित्र स्थळ बोधगया महाविहारावर ब्राम्हणांनी अनाधिकृत कब्जा केला आहे.ते बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मुद्द्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पाच टप्प्यांपैकी दुसऱ्या टप्प्यातील धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची अध्यक्षता बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ गंगावणे यांनी केली. आंदोलनाच्या विषयावर गणपत गव्हाळे, किशोर नगारे, भोलानाथ कांबळे, लक्ष्मण कांबळे, शिवाजी मळघणे, जयशील कांबळे, मिलिंद कांबळे, राज वाढे, सीमा जोगदंडे, परमेश्वर राऊत, छायाबाई धुळधुळे, तुकाराम धवसे,विद्या मांडवकर, छाया भगत यांनी उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन केले. या धरणे आंदोलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दीपक कांबळे यांनी मानले.
या शृंखलाबध्द आंदोलनाचे महत्वाचे मुद्दे
महाबोधी टेम्पल ॲक्ट १९४९ बनवून ब्राह्मणांचा अनाधिकृत कब्जा करण्यात आला आहे तो कायदा रद्द करून हे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, महाबोधी महाविहार ही बौध्दांची जागतिक विरासत आहे हा १८९५ मध्ये अनागरिक धर्मपाल विरुध्द महंत या वादाचा निकाल न्यायालयाने बौध्दांच्या बाजुने दिलेला असतानाही यावर ब्राम्हणांचा अनधिकृत कब्जा का?,
जागतिक बौध्दविद्वान फाह्यान व युवानसॉंग यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनात व उत्खनन अहवालानुसार हे पवित्र स्थान बौध्दांचे असल्याचा उल्लेख आहे,महाबोधी महाविहाराच्या जागेवर कब्जा केलेल्या महंताच्या खोलीत अद्यापही बुध्दप्रतिमा,शीलालेख,अभिले खे आहेत.या ऐतिहासिक वास्तु पुरातत्व विभाग,बोधगया संग्रहालयात जमा करण्यात याव्या,ईव्हीएम मशीनमुळे बौद्धांच्याच नव्हे तर सर्व भारतीयांना मिळालेला मताचा अधिकार प्रभावशुन्य झाला आहे.म्हणुन ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात.
या मुद्य्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यासाठी अथक परिश्रम अविनाश भवरे, विकास गडधने यांनी घेतले.
या आंदोलनासाठी बहुजन समाजातील बहुसंख्य महिला,पुरुष व तरुण उपस्थित होते.