देशाचे नाव आता ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ करण्यासाठी केंद्र सरकार मधे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-२० देशांच्या राष्ट्राध्यक्षांसाठी आयोजित स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुर्मू यांचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा करण्यात आला आहे. त्यावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात देशाचे नाव ‘भारत’ करण्यासाठी केंद्र सरकार विधेयक पारित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु या चर्चेमुळे राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली आहे. केंद्र सरकार देशाचे नाव बदल करण्याच्या उद्देशातून नवीन राजकीय खेळी तयार करीत असल्याचे विरोधक बोलत आहेत. परंतु मुळात देशाचे नाव बदलता येणार का हाच प्रश्न जनतेला पडला आहे.
जेंव्हा आपला देश 1947 ला स्वातंत्र झाला त्यावेळी देशाचे नाव काय असावे यासाठी चर्चा सुरू झाली, तेंव्हा देशाला हिंदूस्थान, भारत, व इंडीया अशी नावे समोर आली होती. परंतु तीन पैकी देशाला एकच नाव असावे अशा सुचना आल्यावर सर्वमतानी निवड करण्यासाठी मतदानाचा पर्याय समोर आला. देशाला कोणते नाव देण्यात यावे यावर बराच काळ बैठकावर चर्चा झाल्या होत्या. शेवटी मंत्रीमंडळातील र्सव सदस्यांनी एकत्र येऊन मतदान केले आणि भारत व इंडीया या नावांना समान मते प्राप्त झालीत. याच आधारावर भारत किंवा इंडीया असे संबोधल्या जावे असा ठराव घेण्यात आला. यामध्ये संविधान रचिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा इंडिया या नावालाच मत दिले होते. म्हणूण सविधानामधे INDIA THAT IS BHARAT असा उल्लेख दिसतो. परंतू सविधानामधे देशाचे नाव बदल करण्याचा कुठलाही अनुच्छेद नसतांना अशाप्रकारचे विधेयक सादर करणे मुळात हे संविधान विरोधीच आहे. याआधी सुद्धा केंद्र सरकारने देशाचे नाव बदल करण्यासाठी याचीका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने त्या याचिकेवर सकारात्मक निर्णय दिला नाही.
आता प्रश्न पडतो की इंडीया हे नाव कसे प्रचलीत आहे. हे नाव देशाला कसे ठेवण्यात आले. या नावाबद्दल आपणाला संभ्रम दिसतो. जेंव्हा देशात सिंधू संस्कृती प्रचलीत होती त्यावेळी भारतामधे अरब आणि युरोपीय लोकांचे व्यापारी संबंध चांगले होते. या अरबीयांनी युरोपीय लोकांना सिंधू ऐवजी हिंदू शब्द प्रचलीत करून या संस्कृतीची माहीती दिली. आणि यातूनच युरोपीय लोकांनी हिंदू ऐवजी इंडूज हा शब्द प्रचलीत केला. नंतर इंडूज हा शब्द इंडीया म्हणूण वापरात आला. परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासानुसार सांगायचे झाले तर INDIA हा शब्द INDIGO या शब्दापासुन प्रचलीत झाला. INDIGO ही युरोपातील एक मागासवर्गीय लोकांची जमात आहे; अशी लोक की ज्यांचा विकास झालेला नाही तर ते विकासाच्या मार्गावर आहेत आणि आपल्या देशात 75% ते 80% लोक मागासवर्गीयच आहेत की जे विकासाच्या मार्गावर आहेत, यांच्या विकासासाठी आपण यांना Indian People असे संबोधावे अशी मान्यता झाली व इंडीया हा शब्द प्रचलीत झाला. तसेच देशाला भारत संबोधन्यामागे महाभारतानुसार आपल्या देशाला भारतवर्ष हे नाव, शुर व पराक्रमी राजा भरत चक्रवर्ती यांच्या नावावरून पडले. राजा भरत हे भरत राजवंशाचे संस्थापक आणि कौरव आणि पांडवांचे पूर्वज होते. ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय, असे संबोधले जाऊ लागले. म्हणुण डाॅ. भिमराव आंबेडकर यांनी सविधानामध्ये देशाला INDIA THAT IS BHARAT असे लिखीत स्वरूपात सांगीतले आहे.
भारत हा संघराज्य आहे, विविध जाती धर्माची लोक या देशामध्ये राहतात. विविध जाती, धर्म, पंथ व संस्कृतीने हा देश नटलेला आहे, यामधे हिंदू, मुस्लीम, शिख, जैन, बौध्द व इसाई अशा सर्वच धर्माची लोक एकमताने या भारत देशात राहतात. अशा देशाला एक विशिष्ट प्रकारच्या धार्मीक किंवा जातीय शब्दानेच संबोधने योग्य नाही. याठीकाणी कुठेतरी राजकारण, जातीवाद किंवा समाजवाद दिसत आहे. आज भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीच्या जवळपास असून एकही नागरीक देशाचे नाव बदलावे यावर कल्पनाही करू शकत नाही. मग आजच हा प्रश्न का मांडण्यात आला; हे कोडेच आहे. अशा प्रकारचा ठराव सविधान विरोधी असून देशाला घातक आहेत. आजचे राजकारण फार वाईट परीस्थीतीकडे वाटचाल करीत आहे. अशा प्रकारचे वादीत प्रश्न निर्माण करून पुन्हा जुन्या वादाला उखरून काढले जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. इथे प्रत्तेक व्यक्ती स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यात व्यस्त आहे, परंतु मी प्रथमतः आणि अंतीमतः भारतीयच आहे, ही संकल्पना लयाला जात आहे.
प्रा. प्रज्ञानंद थोरात
अकोला,
मो- 9822674487