भिमराव परघरमोल लिखित विचार प्रवाह या पुस्तकाचे विमोचन!

(तेल्हारा प्रतिनिधी) दि.१७ ऑक्टोम्बर २०२२

स्थानिक तेल्हारा जि. अकोला येथील शिवनगर मध्ये विचार मंथन सोहळा घेऊन भिमराव परघरमोल (लेखक, व्याख्याता तथा अभ्यासक फुले शाहू आंबेडकरी विचारधारा) यांच्या ‘विचार प्रवाह’ पुस्तकाचे विमोचन (प्रकाशन) करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, गेल्या पाच वर्षांपासून भिमराव परघरमोल यांच्याकडे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथपठनाची परंपरा आहे. त्या उपक्रमामध्ये शहरातील विविध जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात. तसेच यावर्षी त्यांच्या नवनिर्मित घराचा (मूलनिवासी सदन) गृहप्रवेश व स्वलिखित पुस्तकाचे विमोचन असा त्रिवेणी संगम घडवण्यासाठी त्यांनी विचार मंथन सोहळ्याचे आयोजन केले. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊ भोजने (ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक, वरवट बकाल) तर प्रमुख पाहुणे म्हणून, भाई बाबुराव सरदार (भूमी मुक्ती मोर्चा आंदोलन, जलंब जिल्हा बुलढाणा) जीवन गावंडे (संपादक तथा निवेदक MNT न्यूज नेटवर्क नागपूर) धनंजय झाकर्डे (चेअरमन बामसेफ़ पब्लिकेशन विंग नई दिल्ली) दिलीप फोकमारे गजल गायक, लक्ष्मणराव तिव्हाणे ( कुणबी समाज नेते कळमखेड) यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भदंत विनयपाल व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून उपस्थिताना भंतेजींनी धम्मदेशना दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विचार प्रवाह या पुस्तकाचे विमोचन करून, लेखकाला त्यावर विचार व्यक्त करण्यासाठी प्राचारण केले.

उपस्थित मान्यवरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म, भारतीय संविधान तथा विचार प्रवाह यातील तत्त्वज्ञानावर आपापले विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश नृपनारायण यांनी केले तर आपल्या उत्कृष्ट शैलीतील संचालन डॉ. सरवदे (तहसील कार्यालय संग्रामपूर) यांनी करून आभार वैभव परघरमोल यांनी मानले. कार्यक्रमाला शहरासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित तथा फुले शाहू आंबेडकरी विचारधारा प्रेमी लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीधरराव भगवार, गोपाल खोपले, विनोद आढाव, गौतम वानखडे, महादेव धुरंदर, विनोद वानखड़े, सिद्धार्थ बोदडे, देऊळकर, मिलिंद बोदडे मोहित भिलंगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published.