
स्थानिक : अकोला
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रमाबाई चौक भीमनगर येथे सम्राट अशोक सेना व मनोज दादा शिरसाट मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आर्केस्ट्रा व भीम गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भीम गीतांच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम हा मनोज दादा शिरसाट यांच्या अध्यक्षते खाली पार पडला तर चंदू दादा श्रावण शिरसाट (पैलवान) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्रात या महापुरुषांचे नाव टिकून ठेवणं काळाची गरज आहे नाहीतर हे अंधश्रद्धा, जादूटोणा, देव, चमत्कार याचा खोटा प्रचार करून या महापुरुषांचे विचार नष्ट करण्याचे काम केले जाईल. म्हणून मनोज दादा शिरसाठ यांनी हा कार्यक्रम आयोजित करून अंधश्रद्धेला कुठलाही थारा न येऊ देता महापुरुषांचे विचार घरोघरी पेरण्याचा काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले, आमचा महाराष्ट्र हा विज्ञानवादी आहे आम्ही अंधश्रद्धेला लातडून पाडून व महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचं काम करू असे देखील त्यांनी सांगितले. अशा कार्यक्रमाची आणि प्रबोधनाची नितांत गरज समाजाला आहे.
कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष आकाश शिरसाट व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.