महाराष्ट्रातील तिसरी शक्ती….!- भास्कर भोजने

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी १९८० पासून राजकीय पटलावर कामाला सुरुवात केली १९८३ ला भारिप ची स्थापना केली आणि १९९३ ला बहूजन महासंघाची स्थापना केली व महाराष्ट्रात तिसरी शक्ती म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे…!! त्याचा इतिहास असा आहे…. *१९९५ मध्ये भारिप बहूजन महासंघाने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पुर्ण ताकदीने लढविली साडे सतरा लाख मते घेतली म्हणून सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष सत्तेबाहेर फेकल्या गेला आणि महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचे सरकार सत्तारुढ झाले…!! तिसरी शक्ती म्हणून भारिप बहूजन महासंघाचा दबदबा निर्माण झाला…!!सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला पराभूत करण्याची क्षमता भारिप बहूजन महासंघा मध्ये आहे हे सिद्ध झाले…!! १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाला खासदारकीच्या ४८पैकी केवळ १६ जागा राखता आल्या महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचा प्रभाव वाढला. त्यावेळी त्याला मीडियाने भगवी लाट म्हणून प्रचारीत केले…!!

१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला भारिप बहूजन महासंघाच्या ताकदीची जाणिव झाली आणि म्हणून युतीची गरज भासू लागली कॉंग्रेस, भारिप बहूजन महासंघाची युती झाली आणि कॉंग्रेस पक्षाचे १६ चे ३३ खासदार झाले, भगवी लाट भारिप बहूजन महासंघाने परतवून लावली…!! १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, भारिप बहूजन महासंघाची युती झाली आणि सत्ताधारी भाजप शिवसेनेला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप बहूजन महासंघाच्या आघाडीचे महाराष्ट्रात सरकार सत्तारुढ झाले…!! १९९५ ते १९९८-९९ या काळात तिसरी शक्ती म्हणून भारिप बहूजन महासंघाने सत्तारुढ कॉंग्रेस पक्षाला पराभूत करून सत्तेबाहेर बसविले आणि कॉंग्रेस बरोबर युती झाल्यानंतर भाजप शिवसेनेची भगवी लाट थोपवून कॉंग्रेस पक्षाला सत्ताधारी बनविले हा इतिहास आहे…!!

कॉंग्रेस पक्षाला पराभूत करून भाजप शिवसेनेला सत्तारुढ करणे तसेच भाजप शिवसेनेला पराभूत करून कॉंग्रेस पक्षाला सत्तारुढ करण्याची किमया तिसरी शक्ती म्हणून भारिप बहूजन महासंघाने केली आहे…!! २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ४५ लाख मते घेतली आणि तिसरा पर्याय म्हणून आपली शक्ती पुन्हा दाखवून दिली आहे…!! भाजपची बी टीम म्हणून हिनवणे हा कुत्सितपणा आहे त्याला राजकीय शहाणपणं म्हणता येत नाही, ती राजकीय समिक्षा नाही तर राजकीय विकृती म्हणता येते…!! वंचित बहुजन आघाडीकडे सत्ताधारी पक्षाला घरी बसविण्या एवढी ताकद आहे हे पुन्हा पिंपरी चिंचवड आणि कसबा च्या पोटनिवडणुकीत दाखवून दिले आहे…!! हा सर्व इतिहास मविआ मधील नेत्यांनी लक्षात घेऊन पुढील वाटचाल केली तर भाजपाला पराभूत करणे सहज शक्य आहे…!!

मविआ मधील नेत्यांनी सरंजामी मानसिकतेतून आपली घराणेशाही शाबूत ठेवण्यासाठी पुन्हा वंचित बहुजन आघाडी ला भाजपची बी टीम किंवा वोट कटवा अशी ऊपाधी देतं विकृतीचे राजकारण केले तर मविआ महाराष्ट्रात भाजपला रोखू शकत नाही हे वास्तव महाराष्ट्रातील जनतेने समजून घ्यावे…!! वरील १९९५ पासुनचा २८ वर्षाचा इतिहास हेच अधोरेखित करीत आहे की, वंचित बहुजन आघाडी ही तिसरी शक्ती भाजपला रोखू शकते…!! शरद पवार, दिल्लीतील कॉंग्रेस नेतृत्व घराणेशाही कडे झुकते की, लोकशाही कडे हा खरा प्रश्न आहे…!!

@.. भास्कर भोजने

Leave a Reply

Your email address will not be published.