बार्टी पी.एच.डी. च्या २१४ बॅचच्या संशोधक विद्यार्थ्यांना युजीसी, एन एफ एस सी, सारथी, महाज्योति अधिछात्रवृत्ती नियमांप्रमाणे पाच वर्षे कालावधी मंजूर करा अन्यथा आंदोलन – राजेंद्र पातोडे

मुंबई, दि.८ – बार्टीच्या (BANRF-2018) पी.एच.डी. च्या २१४ बॅचच्या संशोधक विद्यार्थ्यांना युजीसी, एन एफ एस सी, सारथी, महाज्योति अधिछात्रवृत्ती नियमांप्रमाणे पी.एच. डी. संशोधनाकरिता पाच वर्ष मंजूर करा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच प्रधान सचिव आणि बार्टी महासंचालक ह्याना दिला आहे.

वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने (BANRF-2018) पी.एच.डी. च्या २१४ बॅचच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या लढा हाती घेतला आहे. युजीसी, एन एफ एस सी, सारथी, महाज्योति अधिछात्रवृत्ती – नियमांप्रमाणे पी.एच. डी. संशोधनाकरिता पाच वर्ष मंजूर करणे ही मूळ मागणी असून २०१९ पासून पी.एच. डी. संशोधनाकरिता पाच वर्ष कालावधी मंजूर करण्यात आला असून २०१८ च्या बॅचला जून २०२० मध्ये फेलोशिप अवॉर्ड करण्यात आलेल्या आहेत.सबब २०१९ च्या पाच वर्षे कालावधी हा त्यांना नैसर्गिक नियमानुसार लागू आहे. असे असताना सामाजिक न्याय विभाग जाणीवपूर्वक हा विषय अत्यंत बेजबाबदार पध्दतीने हाताळत आहे.
(BANRF-2018) पी एच डी च्या २१४ संशोधक विद्यार्थ्यांना ५ वर्ष अधिछात्रवृत्ती मिळण्यासाठी बरीच निवेदने, आंदोलने तसेच उपोषण केली आहेत. त्या अनुषंगाने संबंधित विद्यार्थ्यांनी पर्यंत चार वेळा आमरण उपोषण केले आहेत,आणि परत आम्ही ६ मार्च २०२३ पासून बार्टी कार्यालय, पुणे या ठिकाणी परत अमरण उपोषण करत आहे.बार्टी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले असता बार्टी प्रशासन व संबंधित प्रशासन विभागाने संशोधक विद्यार्थ्यांना आश्वासन दिल्या कारणाने आमरण उपोषण स्थगित करून घेते मात्र निर्णय हा मंत्रालय पातळीवर होणार असल्याचे सांगून त्यांना न्याय दिला जात नाही.

ह्यात सर्वात आश्चर्य म्हणजे जो नियम २०१८ बॅचच्या एम फील विद्यार्थ्यांना (BANRF 2018) M.phil च्या संशोधन विद्यार्थ्यांना) लागू करण्यात आला आहे तो ह्या पी एच डि विद्यार्थ्यांना लागु केला जात नाही.
२०१८ बॅचच्या एम फील विद्यार्थ्यांना युजीसी, एन एफ एस सी, सारथी, महाज्योति अधिछात्रवृत्ती – नियमांप्रमाणे एम फील करीता पाच वर्ष लागू करून ०२+०३=पाच वर्षे असा संशोधन कालावधि वाढवून दिला.मात्र पी.एच. डी. संशोधनाकरिता (BANRF 2018 ) च्या २१४ संशोधक विद्यार्थ्यांना UGC, NPSC, सारथी, महाज्योती अधिछात्रावृत्ती नियम बार्टी प्रशासन लागू करत नाही.ही थेट प्रशासकीय दादागिरी आहे.ही खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ई मेल व व्हाटसअपद्वारे वंचित बहूजन युवा आघाडी (BANRF 2018 ) Ph.D. चे संशोधक विद्यार्थीची पुढील मागणी राज्यपाल, मुख्यमंत्री, प्रधान सचिव व बार्टी महासंचालक ह्यांना पाठविला असून ज्याप्रमाणे (BANRF २०१८) एम फील च्या संशोधक विद्यार्थ्याना 02-03-05 वर्ष असा संशोधन कालावधि वाढवून दिला. त्याचप्रमाणे COVID-19 व LOCKDOWN या बाबींचा विचार करून (BANRF-2018) पी एच डी च्या २१४ संशोधक विद्यार्थ्यांना SRF कालावधि दोन वर्षे वाढ करून एकूण संशोधन अधिछात्रवृत्ति पाच वर्ष करण्यातत यावी.
आंदोलक विद्यार्थी आजवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधानसचिव, खासदार, आमदार व विरोधी पक्ष नेते या सर्वांना भेटून निवेदन दिली आहेत. सर्वजण सकारात्मक असूनही अजून हा प्रश्न निकाली लागत नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी पक्ष नेतृत्व एड बाळासाहेब आंबेडकर, सुजात आंबेडकर व युवा प्रदेश अध्यक्ष डॉ निलेश विश्वकर्मा ह्यांच्या सोबत संपर्क साधून निवेदन दिले आहे.सबब वंचित बहूजन युवा आघाडी च्या वतीने हा विषय आणि त्यावरील निर्णय प्रधान सचिव सामाजिक न्याय विभागाचे स्तरावर तात्काळ सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.बार्टी संचालक मंडळाच्या बैठकीत प्रधान सचिव ह्यांनी हा विषय स्कीप करून इतर बाबी वर चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.बार्टी मध्ये कुठल्याही संशोधक विद्यार्थी विषय आला की प्रधान सचिव निधीची बाब पुढे करून शिक्षण आणि संशोधक विद्यार्थी ह्यांना वेठीस धरत आहेत.ह्यापूर्वी सरसकट फेलोशिप मागणी आंदोलन प्रकरणात असाच अनुभव आलेला आहे.सबब सामाजिक न्याय विभागाने आपला दृष्टिकोन दुरुस्त करणे आवश्यक असून लवकरात लवकर आपण निर्णय घेऊन २१४ संशोधक विद्यार्थी ह्याना ५ वर्षे कालावधी लागू करण्यात यावा.अशी मागणी युवा आघाडीने केली आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101

Leave a Reply

Your email address will not be published.