
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे (ओबीसी) मंत्री अतुल सावे आणि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांच्या खात्यात २४७ पदांची भरतीचे कंत्राट ब्रिस्क कंपनीला निविदेविनाच देण्यावरून नवा वाद पेटला असल्याचे सांगितले जाते. बार्टी आणि सामाजिक न्याय विभागातील लुटी नंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे (ओबीसी) लुटीचा कंत्राट ब्रिस्कला बहाल करण्यात सर्वच राजकीय पक्ष सामील असून ह्याची न्यायालयीन चौकशी गरजेची आहे असे मत राजेंद्र पातोडे ह्यांनी व्यक्त केला आहे.
पुणे येथील ब्रिस्क इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीला विधि अधिकारी, वरिष्ठ तंत्रज्ञ, सिस्टीम अॅनॅलिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, संगणक सहायक, संगणक ऑपरेटर, वाहनचालक, पहारेकरी, सफाई कामगार या २४७ पदांसाठीचे कंत्राट विनानिविदा देण्यात आले आहे.ह्याच कंपनी कडून २०१४ पासून सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी मध्ये मोठी लूट सुरू आहे.विशेष म्हणजे कुठल्याही निवेदेशिवाय सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी मध्ये हजारो पदे भरली जात आहेत. कुठल्याही आरक्षणा शिवाय ही पद भरती करण्यात येते ह्या मध्ये मोठा घोळ असून २०१४ पासून ही लूट सुरू असून राजकुमार बडोले सामाजिक न्याय मंत्री असताना २०१७ मध्ये बार्टी च्या लुटी साठी जात पडताळणी समित्या मध्ये मोठ्या प्रमाणात पद भरतीचे कंत्राट देण्यात आले होते.
विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे च्या कार्यालयासाठी बाह्य यंत्रने कडून मनुष्यबळ उपलब्ध करून देणा-या ब्रिस्क कंपनीच्या नावात संशयास्पद बदल झालेले असून निवडप्रक्रीये मध्ये मोठा घोळ आहे.
उधोग उर्जा व कामगार विभागाने दि.१८.६.२०१४ रोजी शासन निर्णय काढून मे. ब्रिस्क फ़ॅसिलीटीज प्रा. लि कंपनीची निवड केली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ह्यांनी कार्यालया करिता बाह्य यंत्रने कडून मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या मागणी प्रमाणे सामाजिक न्याय विभागाने दि.१९.८. २०१४ मध्ये उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या पेंनल वरील मे. ब्रिक्स फ़ॅसिलीटीज प्रा. लि. कंपनिची निवड करण्यास मान्यता दिली होती..तर बार्टी ने मात्र मे. ब्रिस्क इंडीया प्रा. ली. पुणे ह्या कंपनीला १.९.१५ मध्ये कार्यारंभ आदेश दिला आहे.तसेच करारनामा देखील मे. ब्रिस्क इंडीया प्रा. ली. पुणे ह्यांचे सोबत केला आहे.
केंद्र सरकार कडे BRISK INDIA PRIVATE LIMITED Maharashtra ही दि.23/02/2009 रोजी नोंदणी झाली आहे.त्याचा Corporate Identification Number is (CIN) U74900PN2009PTC133563 and its registration number 133563 असा आहे.उधोग उर्जा व कामगार विभागाने देखील ह्या मे. ब्रिस्क फ़ॅसिलीटीज प्रा. लि कंपनिची निवड केली आहे, अशी कंपनीच केंद्र शासना कडे नोंद नाही.त्या मुळे हा सर्व प्रकार संशयास्प्द आहे.तरी ह्या वेगवेगळ्या नावापैकी नेमेकी कोणती कंपनी केंद्र शासना कडे नोंद आहे.त्याचे कर व इतर कागदपत्रे तपासली जावी.
त्या करीता तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री बडोले ह्यांना पुराव्यानिशी तक्रार दिली होती.परंतु कार्यवाही झाली नाही. मुळात दोन वेगवेगळ्या नावाच्या ब्रिक्स कंपनी आहेत. मे. ब्रिक्स फ़ॅसिलीटीज प्रा. लि. कंपनी व मे. ब्रिस्क इंडीया प्रा. ली. पुणे ह्या कम्पनीचे नावाची नोंदणी पासून तसेच नावातील बदला विषयी चौकशी होणे गरजेचे आहे.
कारण उधोग उर्जा व कामगार विभागाने निवड केलेली आणि सामाजिक न्याय विभागाने मान्यता दिलेल्या व बार्टी ने निवड केलेल्या कंपन्याची नावे वेगवेगळी आहेत.ह्या नावाचे बदल का झाले आहेत आणी बार्टी ने कश्याचे आधारे मे. ब्रिस्क इंडीया प्रा. ली. पुणे ह्यांचे सोबत कार्यारंभ आदेश देऊन करारनामा केला त्याची ही न्यायालयीन चौकशी गरजेची आहे.गेली अनेक वर्षें ही कंपनी अनुसूचित जातीच्या निधी आणि अधिकारावर डल्ला मारत आहे.आता तिने ओबीसी मंत्रालय कडे मोर्चा वळविला आहे.