ऑपरेशन प्रहारअंतर्गत बार्शीटाकळी पोलिसांची कारवाई

कोथळी बु. येथे गावठी दारूचा गुत्ता उद्ध्वस्त – 39,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला :अवैध दारूच्या धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत बार्शीटाकळी पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई केली. ग्राम कोथळी बु. येथे करण्यात आलेल्या रेडमध्ये 39,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अजय भीमराव वरठे (वय 40, रा. कोथळी बु.) याच्या कबज्यातून 210 लिटर सडवा मोहा (किंमत 31,500 रुपये) व 40 लिटर हातभट्टी दारू (किंमत 8,000 रुपये) असा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये PSI बोडखे, GPSI दशरथ बोरकर, HC गोकुळ चव्हाण, PC अन्सार (ब. नं.1378), PC स्वप्नील (ब. नं.30) व चालक पो.का. मनीष ठाकरे (ब. नं.943) यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.