LOC (लुक आऊट सरक्युलर) द्वारे अटकेची अकोला जिल्हयातील पहिली कारवाई

दिनांक १८. ०२. २०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक सा. अकोला यांचे मार्गदर्शनाने शंकर शेळके, पोलीस निरीक्षक LCB यांना गोपनीय माहीती मिळाल्यावरून पो.स्टे. बार्शिटाकळी हद्दीतील ग्राम येवता ते कातखेड रोडवर कातखेड शिवारात वैभव हॉटेल चे मालक रविंद्र विष्णुपंत पांडे याचे शेतातील तीन मजली इमारतमध्ये पहिल्या व दुस-या मजल्यावर काही इसम मोबाईल, लॅपटॉप द्वारे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विनापरवाना पैश्याचे हारजितचा ऑनलाईन खेळ खेळवितांना मिळुन आले होते.
सदर कारवाई मध्ये एकुण ३३ आरोपी मिळून आले होते नमुद आरोपी विरुद्ध पो.स्टे. बार्शीटाकळी येथे ६०/२०२५ कलम कलम 318 (4), 112 (2), 3(5) भारतीय न्याय सहींता सहकलम 4, 5 महा. जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह सा यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन मार्गदर्शन केले तसेच त्यांचे आदेशाने सदर गुन्हयाचा तपास स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांचे कडे देण्यात आला. सदर गुन्हयात घटनेपासुन मुख्य ०२ आरोपी फरार होते.
सदर गुन्हयाचा तपासादरम्यान आरोपी महेश बाबाराव डिक्कर याचे त्याचा साथीदार आरोपी मोनीश गुप्ता रा. पुणे याचे सोबत ऑनलाईन बेटींग संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच महेश डिक्कर हा ऑनलाईन बेटींग बाबत प्रशिक्षण घेण्यासाठी दुबई येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून मा. पोलीस अधीक्षक सा. अकोला यांचे आदेशाने दोन्ही फरार आरोपीतांची तात्काळ पासपोर्ट माहिती करून LOC (लुक आऊट सरक्युलर) उघडण्यात आली होती. तसेच आरोपी यांची तपासात माहिती घेतली असता आरोपी नामे महेश बाबाराव डिक्कर हा नागपुर, चैन्नई, हैद्राबाद, बैंगलोर येथुन ब-याचे वेळा श्रीलंका व दुबई येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते.
आरोपी महेश बाबाराव डिक्कर रा. लोहारी खुर्द ता. अकोट जि. अकोला हा दिनांक ०६/०३/२०२५ रोजी आंतराष्ट्रीय विमानतळ बेंगलोर कर्नाटक येथुन विमानाने श्रीलंका येथे पळून जाण्याचे बेतात असतांना विमातळ प्रशासनाकडे LOC (लुक आऊट सरक्युलर) प्राप्त असल्याने नमुद आरोपीयास बेंगलोर विमानतळावर विमातळ प्रशासन यांनी अडवुन स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचेशी संपर्क केला. त्यावेळी मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे परवानगीने तात्काळ पो.उप.नि. गोपाल जाधव व पो. अंम. अब्दुल माजीद यांनी तात्काळ नागपुर येथुन विमानाने खाना होवुन आरोपीस ताब्यात घेवुन आज रोजी नमुद आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता नमुद आरोपीस दिनांक १०/०३/२०२५ रोजी पर्यंत (०४ दिवस) पोलीस कोठडी रिमांड मिळाला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह सा, जि. अकोला, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, जि अकोला, पो.नि. शंकर शेळके, स्था.गु.शा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. गोपाल जाधव स्था.गु.शा. स.फौ. सुनिल धामोळे (जिल्हा विशेष शाखा) व स्था. गुशा. अकोला येथील अंमलदार अब्दुल माजीद, गोकुळ चव्हाण, रवि खंडारे, अक्षय बोबडे, स्वप्नील खेडकर, धिरज वानखडे, सतिश पवार यांनी केली आहे.