अकोट : २६ नोव्हेंबर संविधान दिन हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४९ ला डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या संविधान स्वाधिन केले तो दिवस भारतीय संविधानाने बोलण्याचा, मतदानाचा हक्क दिला. जनसामान्यांचा न्याय हक्कांना वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांचे संविधान जनसामान्यांचा बुलंद आवाज असे प्रतिपादन समाज क्रांती आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंप्राळे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.
अकोट तालुक्यातील आकोलखेड येथील भिमशक्ती युवा मंडळाच्या वतीने संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रफुल्ल जवादे हे होते.तर मुकेश सिरसाट,करुणेश मोहोड, संदिप वासेकर,प्रकाश वंडकार,धनराज किटके,प्रकाश सिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.त्यानंतर चिमुकल्या सोहम वासेकर याने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.त्यामागे सर्वांनी सामुहिकरीत्या म्हटले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रतन खैरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज नगराळे, देवानंद टिपले,धिरज वानखडे,अमर जगताप,मनोज वानखडे,शुभम खिराडे,भारत सिरसाट,गजानन पोघे यांच्यासह भिमशक्ती युवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.