सहाय्यक आयुक्तसमाजकल्याण कार्यालयाच्या शिष्यवृत्ती, स्वाधार आणि घरकूल योजनेची वंचित युवा आघाडी ने घेतली झाडाझडती

अकोला दी. ०८सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अकोला येथील स्वाधार योजना, शिष्यवृत्ती आणि घरकुल योजना बाबत जिल्ह्यात मोठया प्रमाणात आलेल्या तक्रारी वरून आज वंचित बहुजन युवा आघाडी ने धडक भेट देवून झाडाझडती घेत सिस्टम दुरुस्त करून योजना राबवा अन्यथा वंचित च्या स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला.समाज कल्याण उपायुक्त कार्यालयात आज वंचित युवा आघाडी चे महानगर आणि तालुका पदाधिकारी ह्यांनी धडक दिली.स्वाधार योजना, शिष्यवृत्ती आणि घरकुल योजनेत काम करणारे अधिकारी कर्मचारी ह्यांना रेकॉर्ड घेऊन पाचारण करीत आढावा घेण्यात आला.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसंदर्भात आर्थिक मागण्या करीत मंजुरी देत असल्याचे आणि लाभासाठी पैशाची मागणी करणारे दलाल सक्रिय असल्याची तक्रार वंचित बहुजन युवा आघाडी कडे करण्यात आल्या होत्या.त्यावर निकष लावून योग्य लाभार्थी निवड करण्याची आणि त्रुटी पूर्ती करीता कॅम्प आयोजित करून अर्ज निकाली काढण्याचे नियोजन देण्यात आले.तसेच दुसरा हप्ताच्या शिष्यवृत्ती ह्या कोरोनाच्या काळापासून प्रलंबित असून यावर्षी च्या शिष्यवृत्ती वितरणावर परीणाम होतो आहे.त्याबाबत संबंधित अधिकारी कर्मचारी ह्यांचे कडून माहिती घेण्यात आली.कार्यालयात दलाली करणारे बंद करा अन्यथा दलाल ठोकून काढण्याचा इशारा ह्या प्रसंगी देण्यात आला.

रमाई घरकुल आवास योजनेची प्रक्रिया पालकमंत्री यांच्या नावाने प्रलंबित ठेवण्यात आली असून पाच महीन्यांपासुन फाईल सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात पडून आहे.निवड प्रक्रिया आणि इतर कार्यवाही करण्यासाठी ग्रामसभा आणि पंचायत समिती यंत्रणा असताना पालकमंत्री आणि समिती कडे निवड झालेल्या याद्या मंजुरी साठी पाठवून जाणीवपूर्वक अडवणूक सुरू असल्याने ही पद्धत बंद करण्याची समज संबंधित कर्मचारी ह्यांना दिली गेली.कुठल्याही शासन निर्णय किंवा शासन आदेश नसतांना पालकमंत्री आणि समितीचे नावावर घरकुल लाभार्थी वेठीस धरले जाणे सहन केले जाणार नसल्याचे निक्षून सांगितले गेले.

अशा प्रकारे सामाजिक न्याय विभागाची प्रतिमा मलीन करणारी असुन यात सुधारणा व्हावी अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी आपल्या स्टाईलने उत्तर देईल,असा इशारा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, महानगर युवा अध्यक्ष जय रामा तायडे, आशिष मांगुळकर, महानगर महासचिव कुणाल राऊत,संघटक रितेश यादव,तालुका युवा अध्यक्ष संदीप वानखडे, अमोल जामनिक, जिया शाह, यांनी यावेळी दिला.सदर झाडाझडती प्रसंगी समाज कल्याणचे कर्मचारी अशोक कासार, जोशी मॅडम, प्रदीप सुसतकर,कीशोर कदम, रंगारी मॅडम, लांडगे, विक्रम चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.ह्यावेळी युवा आघाडी चे पदाधिकारी सचिन शिराळे,धर्मेंद्र दंदी, दादाराव पवार,राजकुमार दामोदर, विजय तायडे, आदित्य इंगळे, सुबोध वानखडे, आकाश गवई, ऍड आकाश भगत, ऍड प्रशिक मोरे, सुजित तेलगोटे, विदेश बोराडे, प्रसेनजीत रगडे, काझी शहादात अली, अन्वर खान, आनंद खंडारे, ऋषीकेश बांगर, निकी डोंगरे, भूषण खंडारे, विजेंद्र तायडे, विशाल नंदागवळी, संघपाल आठवले, राजेश बोदडे, अक्षय डोंगरे, मंगेश सावंग, अमोल भ शिरसाट, विशाल वानखेडे, नागेश डोंगरे, रणजित तायडे, वैभव खडसे, संतोष सावांग, पंकज खंडारे, मोरेश्वर खंडारे, शुभम हिवाळे, आकाश नितोने, अंकुश गिराम, अभी वैद्य, आकाश सुकाले, लकी वानखडे, सुजित राठोड, चिकू सुरवाडे, शिरीष ओव्हाळ, अंकुश राठोड, अक्षय राठोड, दादू मेंढे, अजय यादव, अमोल करोले, यासीन खान, सुरेश कारोले, स्वप्नील बागडे, आदित्य उमाळे, सुधीर बिरंगणे, राज तायडे, बंटी नाईक , उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.