
अकोला / प्रतिनिधी
ऑल इंडिया संपादक संघ या संघटनेच्या अकोला जिल्हा अध्यक्ष पदी वंचितांचा प्रकाश या साप्ताहिकाचे मुख्य संपादक महेंद्र डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. करण बौद्ध यांनी ही नियुक्ती केली आहे.भारताच्या विविध बाबींवर प्रकाश टाकणारी आणि सर्व सामान्यांचे प्रश्न मांडणारी ऑल इंडिया संपादक संघ ही राष्ट्रीय संघटना असून या संघटनेवर अकोला जिल्ह्यातील वंचितांचा प्रकाश या सप्ताहीकेचे संपादक महेंद्र डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे.
महेंद्र डोंगरे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून वंचितांचा प्रकाश हे साप्ताहिक त्यांनी वंचित समूहाला न्याय मिळवून देण्यासाठी काढला आहे. ऑल इंडिया संपादक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ करण बौद्ध यांनी महेंद्र डोंगरे यांचे सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात असणारी कामगिरी पाहत त्यांची नियुक्ती ही जिल्हाध्यक्ष पदी केली आहे. समाजाच्या सर्व स्तरावरून त्यांचे या बाबत अभिनंदन करण्यात येत आहे.