स्थानिक:
वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हयाची कार्यकारिणी १६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये जिल्हाध्यक्षपदी धीरज इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सम्यक विद्यार्थी आंदोलन सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अरुण सावंत व सम्यक विद्यार्थी आंदोलन सल्लागार समितीचे सदस्य महेश भारतीय यांच्या पत्रानुसार सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा कार्यकारिणी २६ पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
त्यात जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे, उपाध्यक्ष आदित्य बावनगडे, अनिकेत शिरसाट, गौरव वाळूकार, अॅड. श्रीकांत वाहुरवाघ, स्वरूप इंगोले, कौस्तुभ धोपेकर, महासचिवपदी गायत्री डहाके, संघटक कुणाल गोहाड, सहसंघटक ऋषिकेश इंगळे, सचिव मतीन खान लाल खान, शिवा पिंपळकर, राहुल खाडे, नागसेन अंभोरे, स्वप्नील शिरसाट, नागेश गवई, प्रसिद्धि प्रमुख अक्षय डोंगरे, सहप्रसिद्धिप्रमुख अंकित इंगळे, सोशल मीडिया प्रमुख प्रथमेश गोपनारायण, सहमीडिया प्रमुख अंकुश धुरंधर आणि सदस्यपदी अंकित इंगळे, शुभम पारधे, अंकुश बलखंडे, सुयोग इंगोले, शेख सुफियान शेख सुभान अंकुश ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली