
अकोला- ( दि. ११ जानेवारी २०२५)
स्थानिक ए पी एम सी रोड, राजकमल टॅाकीज अकोला येथील ‘वंचीतांचा प्रकाश’ साप्ताहिकाच्या कार्यालयात ‘पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘वंचीतांचा प्रकाश’ साप्ताहिकाचे संस्थापक तथा मुख्य संपादक प्रसिध्द समाजसेवक महेंद्र डोंगरे होते. गेल्या तीन वर्षापासून अविरतपणे ‘वंचीतांचा प्रकाश’ साप्ताहिकाचे कार्य मोठ्या जोमाने सुरु आहे. शहरातील तसेचं जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठवून सामान्य जनतेला योग्य तो न्याय देण्यासाठी वंचीतांचा प्रकाश साप्ताहिक कटीबध्द राहील असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तशा स्तंभलेखक प्रोफेसर डॅा. एम.आर. इंगळे यांनी केले.

याप्रसंगी शहरातील विविध भागातील बातम्यांसाठी ३० पत्रकारांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना विविध विभाग वाटुन देण्यात आले. जसे कृषि, सांस्कृतिक, शैक्षणिक. क्राईम.खेळ, आरोग्य, मनोरंजन इ. सर्व पत्रकारांना यावेळी नियुक्ती पत्र, ओळखपत्र देवुन मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा असतो म्हणून हे डोळे नेहमी स्वच्छ असले पाहिजे. वृतपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळे याचे जतन सर्वानी मिळुन केले पाहीजे असे प्रतिपादन ‘वंचीतांचा प्रकाश’ साप्ताहिकाचे सल्लागार प्रा. राहुल माहुरे यांनी यावेळी मांडले.

याप्रसंगी प्रा. ॲड. आकाश हराळ, उपसंपादक विशाल नंदागवळी, कुणाल मेश्राम, शुभम गोळे, आदित्य बावनगडे, सिद्धार्थ ओवे, सुमेध कांबळे, प्रज्वल मेश्राम, ॲड. नितीन जामनिक कुणाल मेश्राम,सचिन पाईकराव, पक्षीराज चक्रनारायण, आशिष मेश्राम, प्रथमेश मडामे, शिलवंत शिरसाट, प्रशिक मेश्राम, वैष्णवी अलोने किरण डोंगरे.रोशन इंगळे उपस्थित होते.
