दहशतवाद विरोधी शाखा, अकोला कडुन दहशतवादी हल्ला झाल्यास प्रतिउत्तराकरीता,नागरीक सुरक्षेच्या दृष्टीने इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, डेपो (IOC) येथे “मॉक ड्रिल” चे आयोजन

अकोला प्रतिनिधी : जिल्यातील नागरीकांनी सतर्क रहावे तसेच अकोला जिल्हयांत कोणत्याही ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास त्या हल्ल्यास प्रतिउत्तर कसे दयायचे व नागरीकांना सदर हल्ल्यातुन सुरक्षित कसे बाहेर काढायचे व नागरीकांना सुरक्षितता कशी प्रदान करता येईल. त्याच प्रमाणे दहशतवादी कृत्यांच्या घटनांबाबत जनमानसात जनजागृती निर्माण व्हावी या करीता मा.श्री. जी. बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक, मा. अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री. गोकुळ राज जी, उप विभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत स्थानिक गुन्हे शाखा (LCB), अकोलाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके व दहशतवाद विरोधी शाखा (ATB), अकोलाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक श्री. संतोष तिवारी व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार, बॉम्ब शोधक व नाशक पथक, अकोला, दहशतवाद विरोधी पथक, अकोला येथील पो. अधिकारी व अंमलदार, पोलीस मुख्यालय, अकोला येथील RCP व QRT चे पथक, स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांचे अंमलदार यांचे समन्वयाने दि.२९.०६.२०२४ रोजी १६.१५ वा. पासुन ते १८.२० वा. पावेतो पो.स्टे. उरळ, जिल्हा अकोला चे हददीतील गायगांव येथे “इंडियन ऑईल तेल डेपोमध्ये ३ दहशतवादयांनी त्यांचे मागणी करीता तेथील मुख्य ऑफिस मधील लोकांना ओलीस धरले ” असा बनाव करून मॉक ड्रिल (सराव अभ्यास) चे आयोजन करण्यांत आले. सदर सरावामध्ये QRT पथकाकुडन कारवाई करून त्यामध्ये एक दहशतवादी ठार आणि एका दहशतवादयास जखमी तसेच न्युट्रलाईज करून त्यांनी ओलीस धरलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचा तसेच दहशतवादयांकडे असलेल्या स्फोटकांची BDDS पथकाजवळील उपकरण तसेच श्वान रॅम्बों यांचे माध्यमातुन तपासणी करून सदर कार्यालयामध्ये मिळुन आलेल्या एका जखमी दहशतवादयास RCP चे कंमान्डोज चे माध्यामातुन ताब्यात घेवुन व नंतर पुढील कारवाईकामी त्यास स्थानिक पोलीसांच्या ताब्यात देण्याचा सदर सराव अभ्यास प्रभावीरित्या पार पाडण्यांत आला. सदर सरावामध्ये अकोला जिल्हयातील एकुण १४ अधिकारी तसेच १०४ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.सदर मॉक ड्रिल यशस्वीरित्या व प्रभावीरित्या पार पाडण्यांकरीता पोलीस अधीक्षक मा. श्री. बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक मा. अभय डोंगरे तसेच मा.श्री. गोकुळ राज जी, उप विभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.