
अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, जनतेला वंचितचे आव्हान
अचानकपणे करणी सेना जे स्वतःला राजपूत म्हणवतात त्या करणी सेनेच्या वतीने अजित सेंगर यांना पुढे करण्यात आले आहे आणि भीमा कोरेगावचा इतिहास मिटवण्याचे कारस्थान रचण्यात आले आहे. करणी सेना म्हणजे रजपुतांची सेना. ज्यांना स्वतःचे राज्य वाचवता आले नाही त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये क्षत्रिय गुलाम झाले, की देश गुलाम झाला अशी परिस्थिती होती. त्यांनी महाराणा प्रताप यांचे संरक्षण का केले नाही? याचे स्पष्टीकरण करावे. महाराणा प्रताप यांचे रक्षण भिल्ल समाजाने केले आणि नंतर बंजारा समाजाने केले आणि राजा म्हणून मानसन्मानाने अदबीने महाराणा प्रताप यांचा अंत्यसंस्कार केला आणि अकबराला त्यांच्या देहाला हातही लावू दिला नाही. तेव्हा करणी सेना झोपली होती का? याचा खुलासा करण्यात यावा.शिवाजी महाराजांनी ज्या अलुतेदार बलुतेदारांना सैन्यात आणले त्यांच्या हातून पेशवाईने तलवार काढून घेतली आणि त्यांना पुन्हा जातीच्या व्यवसायात मर्यादित केले. महार सैनिकांनी त्यांना एकत्रित केले आणि भीमा कोरेगाव येथे पेशवाईचा पराभव केला.
या देशातील क्षत्रियांनी देशाला गुलामीत लोटले त्यांनी स्वातंत्र्य, स्वदेश आणि राष्ट्रभक्ती काय असते याचा शहाणपणा आम्हाला शिकवू नये. इथले क्षत्रिय हरल्यानंतर मोगलांचे गुलाम झाले. येणाऱ्या फौजांचे गुलाम झाले, ब्रिटिशांचे गुलाम झाले आणि शेवटी पेशवाई ही ब्रिटिशांची गुलाम झाली. हा गुलामीचा इतिहास भीमा कोरेगाव येथे गाडण्यात आला आणि सामाजिक स्वातंत्र्याची लढाई व त्यातून राजकीय स्वातंत्र्याच्या लढाईचे बीजारोपण झाले व राजकीय स्वातंत्र्याचा लढा उभा राहिला. तेव्हा हा जो आरएसएसचा जातीय तेढ निर्माण करण्याचा खेळ चालता आहे तो त्यांनी घाबवावा अन्यथा आरएसएसला याचेदुष्परिणाम भोगावे लागतील. ज्या पद्धतीने करणी सेनेचे सिंगर बिनडोक, बेअक्कल व इतिहासाची जाणीव नसलेले वक्तव्य करत आहे आणि तेसाम टीव्ही 24/7 दाखवत आहे यावरून राजकीय भूमिका स्पष्ट होत आहे की, साम टीव्ही राष्ट्रवादीशी संबंधित आहे आणि राष्ट्रवादीचे अनेकनेते हे बीजेपी आणि आरएसएसच्या रडारखाली आहेत आणि म्हणून स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून आरएसएसचे बाहुले बनले आहेत.आणि पुन्हा एकदा दंगल पडावी अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. महाराष्ट्रातील क्षत्रिय संभाजी महाराजांची विटंबना थांबवू शकतेनाहीत त्यांनी शौर्याच्या गाथा आम्हाला सांगू नयेत, सामाजिक इतिहास हा राजकीय इतिहासा इतकाच मोठा आणि महत्त्वाचा आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन न देता उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जाते यातच मोठे गौडबंगाल दडलेले आहे. मुख्यमंत्री आरएसएस के नाहीत आणि उपमुख्यमंत्री आरएसएसचे आहेत ही परिस्थिती पुरेशी बोलकी आहे. लोकांनी याचा विचार करावा आणि एक तारखेला शांततेने भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाच्या अभिवादनात सहभागी व्हावे व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
