स्थानिक:
अकोला मिराज सिनेमा गृह येथे सत्यशोधक चित्रपट बघायला अकोलेकरांनी आज गर्दी केली होती. तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी सत्यशोधक चित्रपटाविषयी आपली प्रतिक्रिया दिली.
सत्यशोधक चित्रपट हा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असून
वंचित समुहाचं जगणं आणि प्रस्थापितांनी समतेचा केलेला विरोध माडणारा चित्रपट आहे. यात फुले दाम्पत्यांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मांडणारा आला आहे. तरी समस्त जनतेने हा चित्रपट आवर्जून बघावा असे आव्हान देखील त्यांनी केले.
तेव्हा वंचित बहुजन महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.