अँड.अनिशा फणसळकर यांची MIT-ADTUniverty लोणी,पुणे येथील स्कूल मध्ये लीगल एड काॅर्डिनेटर म्हणुन नियुक्ती..!

पुणे (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) पुण्यातील कायदेविषय तज्ञ तसेस आमोदिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा अँड.अनिशा फणसळकर यांची MIT-ADT University लोणी, पुणे येथील स्कूल ऑफ लाॅ मध्ये लीगल एड काॅर्डिनेटर म्हणून सन २०२५ पर्यंत नव्याने नेमणूक करण्यात आली असून तसे पत्र देण्यात आले. तसेच आमोदिनी फाउंडेशन बरोबर लीगल एड सेंटर साठी असोशिएशन करण्यात आले व तसेही पत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी स्कूल ऑफ लाॅ च्या डीन माननीय डाॅक्टर. सपना देव तसेच अँड संध्या बागुल, अँड.नीलीमा चव्हाण, अँड.अनिशा फणसळकर, अँड.अश्विनी कळंबकर उपस्थित होत्या. तसेच स्कूल ऑफ लाॅ ची फॅकल्टी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पुढील कार्यकाळात आमोदिनी फाउंडेशन आणि वकील व काॅन्सीलर म्हणून नक्कीच लोकहीतोपयोगी कार्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत असे अँड.अनिशा फणसळकर यांनी सांगितले. यावेळी एमआयटी काॅलेजचे सुध्दा आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.