
स्थानिक/अकोला श्री.शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अकोला व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रम संस्कार शिबीराचे आयोजन ग्राम सोनाळा येथे समारोप. या शिबिराचे समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे, प्रमुख मार्गदर्शक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थी विकासाचे संचालक डॉ.राजीव बोरकर, राष्ट्रीय सेवा योजना अकोला जिल्हा समन्वयक डॉ सुधीर कोहचाळे, आय क्यू ए सी समनव्यक डॉ आशिष राऊत,प्रमुख उपस्थिती गावचे सरपंच श्री महानाम फुलके, रसायनशास्त्र विभागाचे डॉ रणजीत भडांगे प्रा.नितीन देशमुख ,प्रा.अतुल यादगिरे, मारुती संस्थांन चे अध्यक्ष श्री गोवर्धनजी होनाळे,मुख्यध्यापक अनिल सोनोने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा सचिन भुतेकर यांनी केले,संचालन कु.पायल मोडक तर आभार प्रदर्शन प्रा शुभम राठोड यांनी केले कार्यक्रमाला महिला कार्यक्रम अधिकारी प्रा मयुरी गुडधे प्रा.डॉ प्राजक्ता पोहरे,प्रा सुरभी वालदे अमरावती विद्यापीठ ब्रँड अँबेसिडर रोहन बुंदेले,शिबीर सहायक श्री शिवा रेळे, विद्यार्थी प्रतिनिधी सतिष अस्वार,विद्यार्थीनी प्रतिनिधी सायली गोतमारे,श्री संजय मोहोकार उपस्थित होते.विशेष उपक्रम :- स्वस्तिक पॅटन द्वारे ४,००० वृक्षा चे लागवड श्री नाथन व सरपंच श्री महानाम फुलके यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या वतीने साकार करण्यात आले या उपक्रमाचे कौतुक अनेक मान्यवरांनी केले.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ द्वारे विद्यार्थी विकास संचालक डॉ.राजीव बोरकर,रासेयो अकोला जिल्हा समनव्यक डॉ.सुधीर कोहचाळे, रासेयो सल्लागार समिती सदस्य डॉ सोनल कामे,अमरावती विद्यापीठ ब्रँड अँबेसिडर रोहन बुंदेले.यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट शिबिर म्हणून घोषित करण्यात आले. शिबिर दरम्यान उत्कृष्ठ कार्यकरणाऱ्या स्वयंसेवकांचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या मध्ये उत्कृष्ठ गट,उत्कृष्ठ स्वयंसेवक,उत्कृष्ठ फोटोग्राफी,उत्कृष्ठ वक्ता पुरस्कार प्रदान करण्यात आले.या शिबिर दरम्यान सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान,महिला सक्षमीकरण, युवक मेळावा,कवी संमेलन, आरोग्य शिबीर,जनजागृती रॅली असे विविध उपक्रम राबविण्यात आले महाविद्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.