
अमरावती: कोणतेही संघटन दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी संघटनेतील कार्यकर्ते प्रशिक्षित व दक्ष असणे अनिवार्य आहे. म्हणून समस्त मूलनिवासी बहुजन समाजातील विद्यार्थी, युवा, बेरोजगारांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय समस्यांप्रती जागृत करण्या करिता अमरावती जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबीराचे उद्घाटन बामसेफ चे जिल्हाध्यक्ष मा.प्रा.डॉ. संजय शामकुवर सर यांनी केले. प्रशिक्षक म्हणून मा. जयशील कांबळे भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थ्यांच्या समस्येला वाचा फोडली. तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा.नरेद्र सुखदेवे सर भा.वि.मो. जिल्हा प्रभारी यांनी उपस्थिती दर्शविली.
प्रशिक्षणाचे आयोजन मा.करण तंतरपाळे सर यांनी केले तर मोठ्या संख्येने विद्यार्थी तथा युवकांनी उपस्थिती दर्शविली.