अकोला :स्थानिक सम्यक संबोधि सभागृह येथे आयोजित व्याख्यानात संबोधित करतांना डॉ. नाईक यांनी बाळासाहेब आंबेडकर यांनी आजपर्यंत आपल्या सार्वजनिक जीवनातील बेचाळीस वर्षे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेपुढे आव्हान उभे करतांना शोषित, पिडीत, उपेक्षित समूहाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देवून स्वतंत्र राजकारण उभे करण्याचा प्रयत्न सातत्त्याने करत असतांना निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्यावर होत असलेले (विशेषतः स्वकियांकडून) आरोप निश्चितच वेदनादायी आहे. बाळासाहेबांनी स्वार्थासाठी तडजोडीचे राजकारण केले असते तर, कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी न होता नेहमीसाठी सत्तेवर स्वार असते त्यासाठी आंबेडकर नावंच पुरेसे आहे. म्हणून समाजातील तथाकथित विचारवंतांनी हा विषय गांभीर्याने घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ. मनोज निकाळजे हे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये मा. भास्कर भोजने, मा. प्रसेनजीत गायकवाड नागपूर, मा. पी. जे. वानखडे, मा. डॉ. केशव मेंढे, मा. डॉ. वसंत डोंगरे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
महात्मा फुले-आंबेडकर विद्वत सभे अंतर्गत छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित १५० वृक्षांचे वृक्षारोपण केल्यामुळे इंजी. विनोद आकारामजी खंडारे व निलेश वाहुरवाघ यांचे व्याख्यानाला उपस्थित प्रमुख वक्ते मा. प्रा. डॉ. मनोहर नाईक व मा, प्रसेनजीत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच बबलू तायडे सर यांना महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबाबत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अड. मुरलीधर इंगळे यांना भारत सरकार नोटरी ची मान्यता मिळाल्याबद्दल त्यांचासुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय समन्वयक मा. सिद्धार्थ देवदरीकर यानी, पाहुण्यांचा परिचय मा.डॉ. संजय पोहरे यांनी, सूत्रसंचालन मा. दादाराव गवई यांनी तर आभार प्रदर्शन अड. मुरलीधर इंगळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मा. बी. एस. सोनोने, इंजी. विनोद खंडारे, निलेश वाहुरवाघ, नानाभाऊ शिरसाट व भगवान उमाळे, जिल्हा वितरक, प्रबुद्ध भारत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शहरातील नामवंत लोकांची उपस्थिती होती त्यात प्रामुख्याने डॉ. एम. आर. इंगळे, प्रा. चोरे, डॉ. भोवते व मा. सिद्धार्थ सिरसाट आदींची उपस्थिती होती. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खालील मान्यवरांनी आपले विशेष योगदान दिले आणि आम्ही एक टीम म्हणून जे महात्मा फुले-आंबेडकर विद्वत सभेमध्ये सातत्त्याने काम करत आहोत त्यामध्ये मा. गणेशराव गवई, मा. गणेशराव गोपनारायण, मा. बी. सी. खाडे, मा. रवींद्र कांबळे, मा. जीवराज खंडारे, मा. रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक वानखडे साहेब या सर्वांचा समावेश आहे.