
(तेल्हारा प्रतिनिधी) दि. ३१ ऑक्टोबर २०२२
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कार्यरत असणाऱ्या अल्कन फाउंडेशन नासिक यांच्याकडून भिमराव परघरमोल यांचा सन्मान करण्यात आला.
तेल्हार येथील भिमराव परघरमोल (लेखक, व्याख्याता तथा अभ्यासक फुले शाहू आंबेडकरी विचारधारा तेल्हारा जि. अकोला) यांचा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अल्कन फाउंडेशन नाशिक या संस्थेचे सचिव प्रा. राजेश गोसावी यांच्याकडून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कोरोना काळामध्ये त्यांनी केलेली गोरगरिबांची, गरजूंची मदत, कोरोनाबद्दल समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी केलेले लिखाण, समाजामधील अनिष्ट रूढी परंपरा यावर लेखणीच्या व व्याख्यानाच्या माध्यमातून प्रहार करत केलेले समाज प्रबोधन , भारतीय संविधानाबद्दल समाजमनामध्ये सन्मान सुरक्षा व त्याचे संवर्धन करण्याची उर्मी निर्माण व्हावी त्यासाठी राबवत असलेले BS4 (भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा तथा संवर्धन) अभियान, महापुरुषांच्या स्वप्नातील भारत आकार घेण्यासाठी घेत असलेले कष्ट, करत असलेल्या त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व त्यांचे शैक्षणिक कार्य या सर्वांची दखल घेत अल्कन फाऊंडेशन नासिक या संस्थेचे सचिव प्रा. राजेश गोसावी यांनी तेल्हारा येथे येऊन त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.